पुणे , २२ नोव्हेंबर २०२३: अल्टीमेट खो-खो ( UKK) चे दुसऱ्या पर्वासाठी पुनित बालन यांच्या सह मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाने प्लेअर्स ड्राफ्टमधून २६ प्रतिभावान खेळाडूंनी निवड केली आहे आणि हा प्लेअर्स ड्राफ्ट भुवनेश्वर येथे पार पडला.
लीगमध्ये अधिक ऊर्जा आणि वेग जोडण्यासाठी मुंबई खिलाडीज संघाने उदयोन्मुख तरुणांना संधी देण्यावर लक्ष केंद्रित करून हे खेळाडू निवडले आहेत. त्यांनी ओडिशातील १६ वर्षीय सुनील पात्राची निवड केली आहे. त्यांनी मुंबईचा मुलगा अनिकेत पोटे आणि सुभाष संत्रा यांच्यासह मागच्या पर्वात अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.
“आम्ही गजानन आणि श्रीजेश यांना संघात कायम ठेवले आहे. हा एक चांगला ड्राफ्ट होता आणि महाराष्ट्रातील सुमारे ८ ते १० खेळाडू मुंबई खिलाडीजसाठी खेळतील. गेल्या मोसमात संघाचा भाग असलेल्या काही खेळाडूंचीही आम्ही निवड केली आहे. या खेळात तुम्हाला तंत्र तसेच तरुण खेळाडू आवश्यक आहेत, कारण ते वेगवान आहेत. असे संयोजन लक्षात घेऊन, आम्ही आगामी हंगामासाठी २६ खेळाडूंचा संघ तयार केला आहे आणि मला आशा आहे की ते चांगली कामगिरी करतील,” असे मुंबई खिलाडीजचे सह-मालक पुनित बालन म्हणाले.
विशेष म्हणजे, मुंबई खिलाडीज संघाने सीझन २ च्या ड्राफ्टमध्ये पहिली निवड ठाण्याच्या महेश शिंदेची केली. २८ वर्षीय बचावपटू व्यतिरिक्त, मुंबई खिलाडीज संघाने गजानन शेंगल आणि श्रीजेश एस यांना लीगच्या पहिल्या आवृत्तीत त्यांच्या प्रभावी कामगिरीनंतर कायम ठेवले आहे. मुंबई खिलाडीज संघ हा पुनित बालन, जान्हवी धारिवाल बालन आणि बादशाह यांच्या सह-मालकीचा आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) च्या सहकार्याने अमित बर्मन यांनी प्रोत्साहन दिलेले, अल्टीमेट खो खो स्वदेशी खेळाच्या वाढीची पुनर्कल्पना करण्याच्या आपल्या ध्येयात स्थिर आहे.
“अल्टीमेट खो खो सीझन १ हा त्याच्या अविचल यशाचा पुरावा आहे, कारण त्याने भारतात प्राइम-टाइम स्टेपल बनण्यासाठी १६४ दशलक्ष संचयी रिच नोंदवले आहे. एकूण १४५ ड्राफ्ट तयार केलेल्या खेळाडूंमधून ३३ खेळाडू हे १६ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत. जे एकूण ताकदीच्या २३% आहे आणि १४५ खेळाडूंचे सरासरी वय २२.५ वर्षे आहे. त्यामुळे सीझन २ अधिक वेगवान, आव्हानात्मक, स्पर्धात्मक आणि चाहत्यांसाठी मनोरंजक होईल. आम्हाला UKK हे तरुणांसाठी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उत्पादन बनवायचे आहे. आम्हाला आशा आहे की सीझन २ मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि भारतातील तरुणांना प्रेरणा देईल,” असे अल्टीमेट खो खोचे सीईओ आणि लीग कमिशनर तेनसिंग नियोगी यांनी सांगितले.
संघात कायम राखलेल्या खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये दिले गेले. फ्रँचायझीने अ ( ५ लाख), ब ( ३ लाख), क ( १.५ लाख) आणि ड ( १ लाख) अशा चार गटांतून खेळाडूंची निवड केली आहे. सीझन २ प्लेअर्स ड्राफ्टसाठी १८ राज्यांमधून एकूण २९३ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती, कारण फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या १८ खेळाडूंसह ड्राफ्टमधील १४५ खेळाडूंसाठी एकूण ३.९ कोटी कोटी खर्च केले होते. भारतातील पहिल्या-वहिल्या फ्रँचायझी आधारित खो-खो लीगच्या सीझन २ मधील थरारक सामने Sony Pictures Networks India (SPNI) च्या क्रीडा चॅनेलवर तसेच Sony LIV वर थेट प्रसारित केली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहित टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत? टी-20 वर्ल्डकपआधी समोर आली महत्वाची माहिती
CWC 2023 । ‘खेळाडू अस्वस्थ वाटत होते’, मोदींचा ड्रेसिंग रुम भेटीवर जोरदार टीका