---Advertisement---

श्रमिक जिमखाना मैदानावर रंगणार “मुंबई महापौर चषक” कबड्डी स्पर्धाचा थरार

On: गुरूवार, फेब्रुवारी 28, 2019 4:01 PM
---Advertisement---

मुंबई शहर कबड्डी असो. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दि. १ ते ४ मार्च २०१९ या कालावधीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. महाराष्ट्र राज्य असो.च्या मान्यतेने ना.म.जोशी मार्ग, मुंबई येथील श्रमिक जिमखाना येथे होणार आहे.

या स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मध्य रेल्वे, युनियन बँक, देना बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक,मुंबई पोलीस, मुंबई बंदर, जे.जे.हॉस्पीटल, नाशिक आर्मी, बी.ई.जी. सह यजमान मुंबई महानगरपालिका आदी मातब्बर व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. महिला गटात शिवशक्ती, डॉ.शिरोडकर, अमरहिंद, महात्मा गांधी, संघर्ष क्लब, स्वराज्य स्पोर्ट्स, होतकरू मंडळ, शिवतेज मंडळ, बालचीन मंडळ, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग आदी संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेकरिता ३ मैदाने तयार करण्यात येत असून सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील.यंदाच्या वर्षी या स्पर्धेत रोख रकमेच्या बक्षिसाच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन्ही विभागाकरिता समान रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.पुरुष व महिला गटातील अंतिम विजयी संघांना “महापौर चषक” व रोख रु. एक लाख(१,००,०००/-), तर उपविजयी संघांना चषक व रोख रु.साठ हजार ( ६०,०००/-) प्रदान करण्यात येतील. दोन्ही गटातील उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.पंचवीस हजार (२५,०००/-)देऊन सन्मानित करण्यात येईल.

स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या दोन्ही गटातील खेळाडूस प्रत्येकी रोख रु.दहा हजार(१०,०००/-) देण्यात येतील. तसेच दोन्ही गटातील स्पर्धेतील उत्कृष्ट पकड व चढाईच्या खेळाडूस प्रत्येकी रोख रु.सहा हजार (६,०००/-)देण्यात येतील. या स्पर्धेच्या निमित्ताने रु. सहा लाख( ६,००,०००/-)च्या जवळपास रोख रकमेच्या बक्षिसांचे वाटप होईल.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघाची ४ गटात विभागणी करण्यात येणार असून स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील.या स्पर्धेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून पदाधिकारी व कार्यकर्ते स्पर्धेच्या यशस्वी साठी जोमाने कार्यरत झाले आहेत. अशी ही मुंबईतील मानाची स्पर्धा पहाण्यासाठी मुंबईतील तमाम कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे जाहीर आव्हान या पत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो.चे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment