लहान मुलांपासून ते मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंपासून ते उद्योजकांपर्यंतचाही समावेश असतो. विशेष म्हणजे, पोलीसही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात. त्यात मुंबई पोलिसही आघाडीवर आहेत. मुंबई पोलीस ज्याप्रकारे ट्विटरवरून लोकांच्या समस्या सोडवतात, तसेच ते जशाच तसे उत्तरही देताना दिसतात. काही वेळा त्यांचे उत्तर इतके भन्नाट असते की, ते ट्वीट व्हायरल झाल्याशिवाय राहत नाही. आताही त्यांनी आयपीएल 2023मधील संघ पंजाब किंग्सला जबरदस्त रिप्लाय देत ट्रोल केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
झाले असे की, मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) संघात आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा 31वा सामना पार पडला. हा सामना पंजाबने अखेरच्या षटकात 13 धावांनी जिंकला. ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर दोन गुणवत्ता असणाऱ्या संघातील हा सामना खूपच रोमांचकरीत्या पार पडला. मात्र, पंजाबच्या या विजयापेक्षाही जास्त चर्चा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या शेवटच्या षटकाची सुरू आहे. त्यानंतर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने मुंबई पोलिसांना टॅग करत मजेशीर ट्वीट केले. मात्र, पंजाबच्या ट्वीटवर मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी उत्तर देत त्यांनाच ट्रोल केले.
अर्शदीप सिंग याने त्याच्या अखेरच्या षटकात सातत्याने योग्य यॉर्कर चेंडू फेकले. तसेच, सलग दोन चेंडूंवर स्टंप तोडले. यावेळी त्याने अनुक्रमे तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा याला बाद केले. पंजाबच्या संघाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अखेरच्या षटकात अर्शदीपच्या शानदार कामगिरीनंतर मुंबई पोलिसांचे अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग करत मजेशीर ट्वीट केले. याचे उत्तर देताना मुंबई पोलिसांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
पंजाब किंग्सचे ट्वीट
पंजाब किंग्सने विजयानंतर तुटलेल्या स्टंपचा फोटो शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले की, “मुंबई पोलीस, आम्ही एका गुन्ह्याची तक्रार देऊ इच्छितो.” खरं तर, हा अर्शदीपच्या 20व्या षटकातील तुटलेला स्टंपचा फोटो होता. पंजाबच्या चाहत्यांनी या ट्वीटची मजा घेण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी लक्षवेधी उत्तर दिले.
Hey @MumbaiPolice, we'd like to report a crime. 👀 pic.twitter.com/x9FVPbxHzy
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 22, 2023
पंजाब किंग्सला मुंबई पोलिसांचे उत्तर
पंजाब किंग्सच्या मूळ ट्वीटचा उल्लेख करत मुंबई पोलिसांनी लिहिले की, “ज्या प्रकारे भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे, तसेच आयपीएल फ्रँचायझीसाठीही एफआयआर दाखल करण्यासाठी ट्रॉफी जिंकणे बंधनकारक आहे.”
https://twitter.com/MumbaiPolicee/status/1649840183616077827?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1649840183616077827%7Ctwgr%5Eaeace48096b35d4c6bd8ded3a8597790fdca4e0b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Fcricket-news%2Fmumbai-police-brutally-trolls-punjab-kings-after-mi-vs-pbks-ipl-2023-match-check-out-537443%2F
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाऊंटवरून हे ट्रोल करणारे उत्तर होते. यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी या ट्वीटवर रिट्वीट, लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.
पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 6 विकेट्स गमावत फक्त 201 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना पंजाबने 13 धावांनी नावावर केला. (mumbai police brutally trolls punjab kings after win against mumbai indians in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
W W W W : कोच नेहराचा संदेश अन् श्वास रोखायला भाग पाडणारी लास्ट ओव्हर, मोहितकडून लखनऊची फलंदाजी उद्ध्वस्त
Video : विरोधी संघात असणाऱ्या आपल्या भावाला हार्दिककडून कडकडून मिठी, जर्सीही केली अदलाबदल