मुंबई रणजी संघाने मेघालय संघाला साखळी फेरीत तब्बल 456 धावांनी दणदणीत पराभूत करत 2024-25 सालच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य-पुर्व फेरी गाठली. एलिट ए गटातून मुंबई व जम्मू काश्मिर हे संघ उपांत्य-पुर्व फेरीत पोहचले. आता हाच मुंबई संघ एलिट सी ग्रुपचा टॉपर असलेल्या हरियाणा संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. भारतीय संघाकडून खेळलेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू यावेळी मुंबई संघाचा भाग असतील.
42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणारा मुंबई संघ आपल्या 43व्या विजयासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे हा संघ हरियाणाविरुद्ध तगड्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यामुळे पुढच्या सामन्यात शिवम दुबे आणि सुर्यकुमार यादव हे संघाचा भाग असतील. शिवम दुबे हा नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात सामनावीर ठरला होता तर सुर्यकुमार यादवला मनासारखे प्रदर्शन करता आले नसले तरी तो विजेत्या संघाचा कर्णधार होता.
जम्मू काश्मिरविरुद्ध झालेल्या सहाव्या साखळी सामन्यात मुंबईक़डून यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे खेळले होते. परंतू या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मेघालयविरुद्ध मात्र अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर हेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळताना दिसले, तर शिवम दुबे हा इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेत खेळताना दिसला.
आता मात्र टी20 मालिका संपल्यामुळे व वनडे संघात निवड न झाल्यामुळे सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे मुंबई रणजी संघात परतले आहेत. हरियाणाविरुद्धचा सामना रोहतकच्या बन्सिलाल स्टेडियमवर 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
उपांत्यपुर्व फेरीसाठी हरियाणाविरुद्ध मुंबईचा असा असेल संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटियान , मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, ‘या’ कारणामुळे विराट कोहली प्लेइंग 11 मधून बाहेर
दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन
IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी






