नागपुर | रणजी ट्राॅफी स्पर्धेत विर्दर्भाने मुंबईवर १ डाव आणि १४६ धावांनी आज विजय मिळवला. दुसऱ्या डावात विदर्भाकडून अदित्य सरवटेने ४८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. सामन्याचा आजचा तिसरा दिवस असतानाच मुंबईला हा पराभव पहावा लागला आहे.
या विजयात मुंबईकर असलेला परंतु सध्या विदर्भाकडून खेळत असलेल्या वसिम जाफरला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले.
विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या स्टेडियमवर विदर्भाने पहिल्या डावात १० बाद ५११ धावा केल्या होत्या. यातील १७८ धावा एकट्या ४१ वर्षीय वसिम जाफरने केल्या.
या धावांचा पाठलाग करताना मुंबईचा पहिला डाव २१० धावांवर गडगडला. त्यानंतर विदर्भाने मुंबईला फाॅलो- ऑन दिला होता. यानंतर आज मुंबईचा दुसरा डावही ३४.४ षटकांत ११३ धावांवर गडगडला.
वसिम जाफर हा विदर्भाच्या संघातील स्टार खेळाडू असून तो गेले काही हंगाम विदर्भाकडून खेळत आहे. त्याला मुंबईने संधी न दिल्यामुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
तसेच या संघाला गेल्या हंगामात पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
यावर्षी देखील या खेळाडूने विदर्भाकडून ७ सामन्यात ६६.५०च्या सरासरीने ६६५ धावा केल्या आहेत.
यावेळी विदर्भाने ७ सामन्यात ३ विजय तर ४ सामने अनिर्णित राखले आहे. त्यामुळे सध्या त्यांचे २८ गुण असून ते अ आणि ब गटात अव्वल आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचे ७ सामन्यात २ पराभव झाले असून ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. मुंबईचे ११ गुण असून अ आणि ब गटात मिळून १८ संघात ते १४व्या स्थानी आहेत. यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले आहे.
मुंबईच्या नावावर झाला नकोसा विक्रम-
२०१८-१९चा हंगाम मुंबई संघासाठी अतिशय खराब ठरला आहे. त्यात हा संघ २०१५ पासून तीन वेळा डावाने पराभूत झाला आहे. तर १९५२पुर्वी केवळ तीन वेळा संघ डावाने पराभूत झाला होता. १९५२ ते २०१४ या काळात मुंबई कधीही डावाने पराभूत झाला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या:
–२०१८मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज
–२०१८ मध्ये कसोटी क्रिकेट गाजवणारे ५ गोलंदाज
–२०१८ वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज