रणजी ट्रॉफीचा २०२१-२२ हंगाम मध्य प्रदेश संघाने नावावर केला. मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात यावर्षीचा अंतिम सामना खेळला गेला, जो शेवटच्या दिवशी मध्य प्रदेशने ६ विकेट्स राखून जिंकला. मुंबई संघ पहिल्या डावापासूनच मागे पडला होता, परिणामी सामन्याचा शेवट देखील त्यांच्यासाठी वाईट झाला. सामन्यादरम्यान मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मैदानी पंच यांच्यातील वातावरण तापल्याचे पाहिले गेले.
मैदानी पंचांनी सामन्याच्या पहिल्या डावात एक असा निर्णय दिला, ज्यामुळे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संतापला होता. परंतु नंतर रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर समजले की, पंचांनी दिलेला निर्णय अगदी योग्य होता. हा प्रसंग मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात १२५ व्या षटकात घडला. मुंबईचा मोहित अवस्थी या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. खेळपट्टीवर मध्य प्रदेशचा रजत पाटीदार आणि आदित्य तारे फलंदाजीसाठी उपस्थित होते.
मोहित अवस्थिच्या षटकातील एक चेंडू फलंदाजाच्या पॅडवर लागला. चेंडू पॅडला लागल्यानंतर गोलंदाज आणि मैदानात उपस्थित असलेल्या मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. परंतु पंचांना ही अपील फेटाळत फलंदाजाला नाबाद करार दिला. पंचांच्या या निर्णयानंतर मुंबईचे सर्व खेळाडूंना आश्चर्य वाटले. अशातच मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ पुढे आला आणि विकेट मिळण्यासाठी पंचांसाबोत शाब्दिक वाद घालू लागला. फलंदाजाला नाबाद दिल्यामुळे शॉ चांगलाच तापला होता. अनेक वेळ त्याने वाद घालला, पण नंतर रिप्लेमध्ये पंचांचा निर्णय योग्य असल्याचे दिसले. शॉ आणि पंच यांच्यातील हा वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1540894586264252416?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1540894586264252416%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmadhyapradeshsamachar.in%2F2022%2F06%2F26%2Fprithvi-shaw-e0a4b0e0a4a3e0a49ce0a580-e0a49fe0a58de0a4b0e0a589e0a4abe0a580-e0a495e0a587-e0a4abe0a4bee0a487e0a4a8e0a4b2-e0a4aee0a588e0a49a%2F
दरम्यान, उभय संघातील या अंतिम सामना एकंदरीत विचार केला, तर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मुंबईने ३७४ धावा केल्या, तर मध्य प्रदेशने ५३६ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात मध्य प्रदेशने मोठा आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने २६९ धावांवर सर्व विकेट्स मगावल्या. परिणामी शेवटच्या डावात मध्य प्रदेशला अवघ्या १०८ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी हे लक्ष्य ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि २९.५ षटकात गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद
अजब गजब! चेतेश्वर पुजाराने दोन्ही टीमकडून केली बॅटींग, व्हिडिओ व्हायरल