बोरिवली, मुंबई येथे राहणारा खेळाडू आणि रिओ ऑलिम्पिक 2016 आणि टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये डायव्हिंगचे जज असलेले मयूर जनसुखलाल व्यास यांना त्यांच्या खेळातील योगदान आणि अमूल्य कामगिरीबद्दल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ (लंडन) तर्फे ‘लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड्स’ साठी निवडले. ज्यासाठी सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी जे डब्लू मॅरियट हॉटेल, इंदौर, मध्यप्रदेश येथे ‘5 वा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता, जो यशस्वीरित्या पूर्ण झाला.
याप्रसंगी अष्टपैलू मयूर व्यास यांना प्रसिद्ध किरण बेदी यांच्या हस्ते ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स’ देऊन गौरविण्यात आले.यावेळी उदयपूरचे महाराज कुमार साहिब लक्षराज सिंह जी मेवाड,’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष शुक्ला, डॉ.तिथी भल्ला, सतेश शुक्ला आदी तसेच राजकारण, भारतीय चित्रपट आणि कॉर्पोरेट जगतातील मान्यवरांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवून सोहळा यशस्वी केला. पुरस्कार मिळाल्यावर मयूर व्यास यांनी समितीशी संबंधित सर्वांचे आणि आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
मयूर जनसुखलाल व्यास हे सध्या वर्ल्ड बॉडी फीना च्या टेक्निक हाय डायव्हिंग कमिटीचे सदस्य आहेत,एशियन स्विमिंग फेडरेशनच्या तांत्रिक डायव्हिंग समितीचे सदस्य आहेत आणि स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या टेक्निक डायव्हिंग समितीचे अध्यक्ष आहेत.दोन ऑलिम्पिकमध्ये डायव्हिंग जज म्हणून निवडले गेलेले ते भारतातील पहिले व्यक्ती आहेत.
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व