---Advertisement---

Ranji Trophy: रणजी हंगामासाठी मुंबईचा संघ जाहीर, 85 कसोटी खेळलेल्या क्रिकेटर झालाय कर्णधार

On: गुरूवार, जानेवारी 4, 2024 3:58 PM
Mumbai-Ranji-Team
---Advertisement---

Mumbai squad announced for Ranji Trophy: 5 जानेवारी 2024 पासुन सुरु होणाऱ्या प्रतिष्ठेच्या रणजी ट्राफीसाठी सर्व संघाची घोषणा झालेली आहे. 89व्या रणजी ट्रॉफीसाठी 41 वेळच्या विजेत्या मुंबईनेही आपला संघ जाहीर केला आहे. कर्णधारपदी अनुभवी अजिंक्य रहाणे याची निवड करण्यात आली आहे. 15 जणांचा जाहीर झालेला संघ फक्त हंगामाच्या पहिल्या दोन सामन्यांकरीता असणार आहे.

15 सदस्यीय संघाची घोषणा झालेली असुन यामध्ये अजिंक्य रहाणे, सरफराज खान, सुवेद पारकर या प्रमुख फलंदाजासह शिवम दुबे, शम्स मुलानी, जय बिस्टा, भूपेन लालवानी हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. गोलंदाजीची धुरा तनुष कोटीयन , तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर हे सांभाळतील. यष्टीरक्षक म्हणून हार्दिक तमोरे, प्रसाद पवार या खेळाडूंची निवड झालीय.

रणजी ट्रॉफीच्या 88 वर्षांच्या इतिहासात मुंबईने तब्बल 41 वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. तर तब्बल 46 वेळा फायनल खेळण्याचा मान मिळवला आहे. असे असले तरी रणजीमधील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई 2014 पासून विजेतेपदासाठी तरसला आहे.

पृथ्वी शॉ नसेल संघाचा भाग-
स्टार फलंदाज पृथ्वी शॉचे मात्र मुंबई रणजी संघाचा भाग नसेल. पृथ्वी सध्या दूखापतग्रस्त असून, त्याला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यास आणखी वेळ लागेल. मुंबईचा संघ नेहमीप्रमाणे मजबूत वाटत असून सरफराज खान, शिवम दुबे, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी यांसारखे नावाजलेले खेळाडू संघात आहेत. यशस्वी जैस्वाल मात्र भारतीय संघासोबत असल्याने तो पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. साखळी फेरीत असे होतील मुंबईचे सामनेसाखळी फेरीत यावेळी प्रत्येक संघाला 7 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. 7 पैकी 3 सामने हे मुंबईत होणार आहेत. मुंबईतील दोन सामने हे शरद पवार क्रिकेट ॲकॅडमी बीकेसी येथे होणार आहेत. तर एक सामना हा वानखेडे स्टेडिअम होणार आहे. महाराष्ट्राबाहेरील सामने हे बिहारच्या पाटन्यात, केरळच्या त्रिवेंद्रममध्ये, कोलकात्याच्या ईडन गार्डनवर आणि छत्तीसगडच्या राजपूर येथे होणार आहेत. (Ranji Trophy Mumbai team announced for Ranji season, cricketer who played 85 Tests became the captain)

स्पर्धेचा फॉरमॅट कसा?
यावेळी 38 संघ स्पर्धेत भाग घेणार आहेत. यात 38 संघ एलिट व प्लेट अशा दोन गटांत विभागण्यात आले आहे. त्यात एलिट गटात एकूण 32 संघ असून त्यात A,B,C आणि D असे सबग्रुप करण्यात आले आहे. तर प्लेट ग्रुपमध्ये 6 संघ असणार आहेत.

मुंबई संघाचे रणजीच्या 2024 हंगामाचे सर्व वेळापत्रक:
पहीला सामना: 5 जानेवारी 2024, मुंबई विरुद्ध बिहार, मोईन उलहक स्टेडिअम, पाटना.
दुसरा सामना: 12 जानेवारी 2024, मुंबई विरुद्ध आंध्रप्रदेश, शरद पवार क्रिकेट अकॅडमी बीकेसी, मुंबई.
तिसरा सामना: 19 जानेवारी 2024, मुंबई विरुद्ध केरळ, एसटी क्सेविअर केसीए क्रिकेट ग्राउंड, त्रिवंद्रम
चौथा सामना: 26 जानेवारी 2024, मुंबई विरुद्ध उत्तरप्रदेश, वानखेडे स्टेडिअम, मुंबई
पाचवा सामना: 2 फेब्रुवारी 2024, मुंबई विरुद्ध कोलकत्ता, ईडन गार्डन, कोलकत्ता.
सहावा सामना: 9 फेब्रुवारी 2024, मुंबई विरुद्ध छत्तीसगढ, शहीद विर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडिअम, छत्तीसगढ.
सातवा सामना: 16 फेब्रुवारी 2024,मुंबई विरुद्ध, शरद पवार क्रिकेट अकॅडमी बीकेसी, मुंबई.

हेही वाचा

केपटाऊन कोसटी जिंकण्यासाठी भारताला 79 धावांचे लक्ष्य, फलंदाज रबाडा आणि लुंगी एनगिडीला उत्तर देण्याच्या तयारीत
SriLanka Cricket: श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा कहर, क्रिकेटच्या 3 प्रकारात निवडले 3 नवे कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---