क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा युवा लीग 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यांत मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाने 70-21 अश्या मोठ्या फरकाने लातूर विजयनगारा विर्स संघावर विजय मिळवला.
मध्यंतरापर्यत 35-07 अशी भक्कम आघाडी मुंबई उनगर मुर्थाल मॅग्नेट्स कडे होती. संपूर्ण सामन्यांत लातूर विजयनगारा विर्स संघावर 5 वेळा लोनची नामुष्की आली. मुंबई उपनगर संघाच्या चढाईपटूंनी संपूर्ण सामन्यांत 47 गुण मिळवत विजय सोपा केला.
मुंबई उपनगर कडून आकाश रूडलेने चढाईत 14 गुण मिळवले त्याला भारत खारगुटकर ने 8 गुण तर रजत सिंगने 7 गुण मिळवत चांगली साथ दिली. तर बचावफळीत अलंकार पाटीलने 6 पकडी व विघ्नेश पाटीलने 3 पकडी केल्या. लातूर संघाकडून प्रदीप अकनगिरे व सोहेल खान यांनी प्रत्येकी 7-7 चढाईत गुण मिळवले.
● बेस्ट रेडर – आकाश रूडले, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
● बेस्ट डिफेंडर – अलंकार पाटील, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
● कबड्डी का कमाल – भारत खारगुटकर
(Mumbai Ungar Murthal Magnets start with a big win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने घेतली 2 सार्वकालीन महान खेळाडूंची नावे; एक सचिन, पण दुसरा कोण? घ्या जाणून
यापूर्वी खेळलेल्या गुजरात-चेन्नईमधील 2 सामन्यात कोण कुणावर भारी? वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास