मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2025 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला, तसेच आयपीएल स्पर्धेमध्ये वानखेडेवर 8 विकेट्सने पहिला विजय मिळवला. त्यांनी या विजयासोबतच आयपीएलमध्ये महारेकॉर्ड त्यांच्या नावावर केल आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेत एका मैदानावर सर्वात जास्त सामने जिंकणारा संघ ठरला आहे. संघाने याबाबतीत कोलकाता, सनरायझर्स हैदराबाद, सहित सर्व संघांना मागे टाकले आहे.
मुंबईने सोमवार 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल मधील 53 वा विजय मिळवला. हा संघ आयपीएल स्पर्धेमध्ये एका मैदानावर सर्वात जास्त सामने जिंकणारा संघ ठरला आहे. या यादीत कोलकाता दुसऱ्या स्थानी आहे. केकेआरने ईडन गार्डन्स मैदानावर आत्तापर्यंत 52 सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्स या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. सीएसकेने एमए चिदंबरम स्टेडियमवर 51 सामने जिंकले आहेत. चेन्नईने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जास्त सामने जिंकले आहेत.
मुंबई संघाने आयपीएल 2025 स्पर्धेत खूप खराब सुरुवात केली होती. त्यांनी हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळला होता. चेन्नईने त्या सामन्यात मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला. हंगामातील दुसरा सामना मुंबईने गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला होता, हा सामना गुजरातने 36 धावांनी जिंकला. मुंबईने सलग दोन सामने गमावल्यानंतर केकेआर विरुद्ध सामन्यात पुनरागमन करत सामना जिंकला. मुंबईसाठी कोलकाता विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अश्वनी कुमारने 4 विकेट्स घेतल्या तसेच रियान रिकल्टनने नाबाद अर्धशतक केले.
आयपीएल स्पर्धेमध्ये संघाद्वारे एका मैदानात जिंकलेले सर्वाधिक सामने: –
53 – मुंबई इंडियन्स (वानखेड़े स्टेडियम)
52 – कोलकाता नाइट राइडर्स (ईडन गार्डन्स स्टेडियम)
51 – चेन्नई सुपर किंग्स (एम.ए.चिदंबरम स्टेडियम)
44 – रॉयल चैलेंजर्स बंगळुरू (एम.चिन्नास्वामी स्टेडियम)
37 – राजस्थान रॉयल्स (सवाई मानसिंह स्टेडियम)
37 – सनराइजर्स हैदराबाद (राजीव गांधी स्टेडियम)
37 – दिल्ली कॅपिटल्स (अरुण जेटली स्टेडियम)
31 – पंजाब किंग्स (आई.एस. बिंद्रा स्टेडियम)