रणजी ट्रॉफी 2024-25 हंगाम सुरू असल्यामुळे भारतीय निवडकर्ते अनेक खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. जे कीबऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहेत. यामध्ये एक नाव आहे, ते म्हणजे मुंबई संघाकडून खेळणाऱ्या स्टार खेळाडू श्रेयस अय्यरचे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो पुढील रणजी सामन्यातून बाहेर पडला आहे. अशी शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आले आहे.
मुंबई संघाला आपला पुढचा सामना त्रिपुराविरुद्ध 26 नोव्हेंबरपासून आगरतळा येथे खेळायचा आहे. ज्यासाठी अय्यरने संघासोबत प्रवास केलेला नाही. श्रेयस अय्यर या वर्षी सततच्या दुखापतींमुळे खूप अडचणीत आला आहे. त्यातच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो सामन्याच्या मध्यावर अचानक बाहेर पडला होता.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल बोलताना बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, त्याला किमान एक आठवडा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अशा स्थितीत तो त्रिपुराविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळताना दिसणार नाही. दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्राने क्रिकबझला श्रेयस अय्यरबद्दल माहिती दिली की तो 26 नोव्हेंबरपासून आगरतळा येथे होणाऱ्या त्रिपुराविरुद्धच्या सामन्यासाठी संघासोबत जाणार नाही. 23 नोव्हेंबरला सकाळी संपूर्ण टीम रवाना होईल. तसेच, मुंबई क्रिकेट असोसिएशन श्रेयस अय्यरच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूच्या नावाची घोषणा करणार नाही. कारण त्यांनी 21 ऑक्टोबर रोजीच संघाची घोषणा केली होती.
2023 मध्ये श्रेयस अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर तो आशिया कप आणि विश्वचषक दोन्ही खेळला पण त्यानंतर त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यानतर रणजी सामन्यात महाराष्ट्राविरुद्धच्या शतक झळकावल्यानंतर त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमनाची आशा व्यक्त केली होती. अय्यर म्हणाला होता की, माझ्या दुखापतीमुळे मी थोडा निराश होतो हे खरे आहे, पण बऱ्याच काळानंतर शतक झळकावल्यानंतर मला आता खूप बरे वाटत आहे. मी पुनरागमन करण्याचाही प्रयत्न करत आहे.
हेही वाचा-
“बबिताला बृजभूषण सिंगचे पद मिळवण्याची लालूच होती, म्हणून…”, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
वाईट प्रदर्शनानंतरही सिराजला पुणे कसोटीत मिळणार संधी? सहाय्यक प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
नवदीप सैनीचा भर सामन्यात ‘ड्रामा’, मॅच ड्रॉ करण्यासाठी अशी लढवली शक्कल – Video