---Advertisement---

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटरने आपल्याच गावाची अशाप्रकारे केली कोरोनाच्या तावडीतून सुटका

On: बुधवार, जुलै 22, 2020 7:21 PM
---Advertisement---

सुरुवातीला गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील इखार गावात कोरोना व्हायरसमुळे ५ लोक संक्रमित झाले होते. त्यानंतर इखार हे गाव कोरोना व्हायरस कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले. यादरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू मुनाफ पटेलने मोर्चा सांभाळला आणि लोकांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासही सांगितले. याबरोबर त्याने गावाची कोरोना व्हायरसच्या तावडीतून सुटकाही केली.

विश्वचषक २०११ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा मुनाफ आपल्या गावात असताना कोरोनाचा प्रसार झाला. ८ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गावातील संक्रमितांची संख्या ५ लोकांपर्यंत पोहोचली. गावातील लोकांना कोरोना व्हायरसबाबत अधिक माहिती नव्हती तसेच लोकांंना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करणेही कठीण होते.

एप्रिलमध्येच गावात होते ५ लोक संक्रमित

मुनाफने हा मोर्चा सांभाळत गावातील संक्रमितांची संख्या ५ च्या वर जाऊ दिली नाही. ३८ वर्षीय मुनाफ म्हणाला, “जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली, तेव्हा येथील लोकांना कोरोना व्हायरसबाबत अधिक माहिती नव्हती. एप्रिलमध्ये तामिळनाडूहून गावात ५ संक्रमित लोक आले होते. त्यानंतर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, लोक खूप घाबरले होते.”

‘गावातील लोकांना समजावून सांगणे कठीण होते, परंतु मी यशस्वी झालो’

मुनाफने (Munaf Patel) पुढे सांगितले, “गावातील लोकांना सामाजिक अंतराचे पालन करणे म्हणजे बाहेरच्या जगाप्रमाणे व्यवहार करण्यासारखे होते. त्यांना वाईट वाटत होते. परंतु मी त्यांना समजावून सांगण्यास सुरुवात केली की यापासून कशाप्रकारे बचाव केला जाऊ शकतो.” त्याने सर्वांना मास्क घालण्यास सांगितले.

सरपंचानेही म्हटले मुनाफ आहे हिरो

याबाबतीत इखार (Ikhar) गावचे सरपंच हारून हैंदी (Haroon Haindi) यांनी सांगितले, “तो मुनाफचं होता, ज्याने स्थानिक पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर एकत्र काम केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना समजावून सांगितले, की जर सामाजिक अंतराचे पालन केले, तर ते शेतात काम करू शकतात.” त्यांनी पुढे सांगितले, की मुनाफ रोज पंचायतीमध्ये यायचा आणि तासंतास लोकांना जागृत करायचा.

यादरम्यान अनेक लोकांना ताप आला आणि त्यांना सेल्फ क्वारंटाईन (Self Quarantine) व्हायचे होते आणि चाचणी करण्यापासून घाबरत होते. परंतु मुनाफने लोकांना समजावून सांगितल्यामुळे लोकांची भीती कमी झाली. लोकांनी पुन्हा कोरोना व्हायरसची (Corona Virus) तपासणी केली.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टाईट सामना म्हणजे काय? या ३ कसोटी सामन्यांनी एक उदाहरण घालून दिले

-आयसीसीचं टेन्शन वाढलं, वर्ल्डकपच्या प्री बुक तिकीटांचं करायचं तरी काय?

-इंग्लंड संघाला मोठी झटका, वनडे मालिकेआधीच हा खेळाडू झाला जखमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---