---Advertisement---

…म्हणून मुरली विजयला झाली मोठी शिक्षा

---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला सोमवारी मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विजयला कर्नाटक आणि तामिळनाडू दरम्यान दिंडीगुल येथे सुरू असलेल्या रणजी करंडक सामन्यात पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शवल्याबद्दल हा दंड झाला आहे.

ही घडना सोमवारी सामन्यातील दुसरे सत्र संपण्यापूर्वी 70 व्या षटकात घडली. हे षटक आर अश्विन टाकत होता. या षटकात तमिळनाडूच्या संघाने यष्टीरक्षकाद्वारे घेतलेल्या पवन देशपांडेच्या झेलसाठी अपील केले. पण पंच नितीन पंडीत यांनी देशपांडेच्या बाजूने निर्णय दिल्याने तमिळनाडूचा संघ निराश झाला.

त्यावेळी पंडीत यांनी जाऊन अश्विनशी चर्चा केली. त्यावेळी तमिळनाडूकडून खेळणारा विजयही निराश झाला होता. त्याचा राग अनावर झाल्याने स्क्वेअर लेग अंपायर अनिल दांडेकर यांनी विजयला शांत करण्याचा प्रयत्न केला.

तमिळनाडूच्या संघ व्यवस्थापनाने नंतर माहिती दिली की या घटनेबद्दल विजयला 10 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे. या सामन्यात सोमवारी अनेक निर्णय तमिळनाडू संघाच्या विरोधात गेले होते.

या सामन्यात तमिळनाडूने आज दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 165 धावा केल्या आहेत. तर त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकचा पहिला डाव 336 धावांवर संपुष्टात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---