2024चे पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) संपले. ऑलिम्पिकनंतर आता पॅरालिम्पिक (Paralympic) स्पर्धा होणार आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेची सुरुवात (28 ऑगस्टपासून) होणार आहे. ही स्पर्धा (8 सप्टेंबरपर्यंत) चालणार आहे. तत्पूर्वी टोकियो येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारतानं 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 19 पदकं जिंकली होती. पण पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं ते कोण होते?
मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांनी पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं. हेडलबर्ग येथे 1972च्या पॅरालिम्पिकमध्ये, पेटकरनं पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाइल 3 जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. पेटकर हे भारतीय लष्कराचे शिपाई होते आणि पोहण्यापूर्वी ते बॉक्सिंग करायचे. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात देशाचे रक्षण करताना पेटकर यांना अनेक गोळ्या लागल्या, त्यामुळे ते अर्धांगवायू झाले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठीच्या कण्यालाही गोळी लागली होती, जी आजपर्यंत निघली नाही.
मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) युद्धात गंभीर जखमी झाल्यानंतर 18 महिने कोमात राहिले. त्यानंतर ते अर्धांगवायू झाले. डॉक्टरांनी त्याला पोहण्याचा सल्ला दिला. त्यांनी पोहायला सुरुवात केली आणि कठोर परिश्रम घेऊन पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्यावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यननं पेटकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन करिब यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं! आशिया खंडाबाहेर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम
‘एमएस धोनी सारखे आयुष्य जगायचे आहे..’, पुरस्कार सोहळ्यात कर्णधाराने व्यक्त केल्या भावना
तिसरी पत्नी सना जावेदसोबत स्वित्झर्लंडला पोहोचला शोएब मलिक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल