देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत असलेला सरफराज खानचा भाऊ मुशीर खान याचा अपघात झाला आहे. तो इराणी कप खेळण्यासाठी आझमगढ वरून लखनऊला जात होता. या दरम्यान त्याच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातामुळे तो इराणी कपमध्ये खेळू शकणार नाही. याशिवाय मुशीर रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून देखील बाहेर पडू शकतो.
इराणी कपचं आयोजन 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी मुशीर खानची मुंबईच्या संघात निवड झाली होती. हा सामना खेळण्यासाठी मुशीर रस्तामार्गे आजमगढहून लखनऊला जात होता. मात्र वाटेत त्याच्या वाहनाचा अपघात झाला. मुशीर खानला फ्रॅक्चर झालं असून तो इराणी कपमध्ये खेळणार नाही.
मुशीर खानबद्दल बोलायचं झालं तर, तो नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाचा सदस्य होता. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यानं शानदार फलंदाजी केली होती. मुशीर खाननं पहिल्याच सामन्यात 181 धावा ठोकल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी फारशी खास राहिली नाही.
मुशीर खानचा मोठा भाऊ सरफराज खान भारतीय संघाचा सदस्य आहे. त्यानं यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. सरफराजची बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी देखील टीम इंडियामध्ये निवड झाली होती. मात्र त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. सरफराज प्रमाणे मुशीर देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मुशीरनं आगामी रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर, त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होऊ शकतात.
हेही वाचा –
IND vs BAN; कानपूर कसोटीचा दुसरा दिवसही खोळंबला, पावसाची बॅटींग सुरुच
एमएस धोनी की विराट कोहली? दिग्गजानी दिले धक्कादायक उत्तर, म्हणाला- … निवडायला हरकत नाही
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, वनडे सामन्यात कांगारुंचा चौथा सर्वात मोठा पराभव