युवा अष्टपैलू खेळाडू मुशीर खान गेल्या शनिवारी कार अपघातात जखमी झाला होता. या अपघातामुळे तो 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी चषक स्पर्धेतही खेळू शकणार नाही. आता अपघातानंतर पहिल्यांदाच मुशीर खान सर्वांसमोर आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या गळ्याला पट्टा बांधलेला दिसत आहे. तसेच यावेळी मुशीरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आभार मानले आणि चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
काय म्हणाले मुशीर खान आणि त्याचे वडील?
व्हिडिओत सर्वप्रथम नौशाद खान म्हणाले, “सर्वप्रथम मी या नवीन आयुष्यासाठी माझ्या स्वामींचे आभार मानतो. यासोबतच माझ्या प्रियजनांचे आणि आमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्या सर्व नातेवाईकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. एमसीएचे खूप खूप आभार आणि बीसीसीआयने मुशीरची काळजी घेतल्याबद्दल मी एवढेच सांगू इच्छितो की, जे मिळाले त्याबद्दल तुमचे आभार आणि जे मिळाले नाही त्यासाठी धीर धरा.”
तसेच मुशीर खान म्हणाला, “मी आता ठीक आहे आणि माझे वडीलही निरोगी आहेत. आपणा सर्वांच्या प्रार्थनेबद्दल तुमचे खूप खूप आभार.”
View this post on Instagram
भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर त्याचे वडील नौशाद खान यांच्यासोबत लखनऊला जात होता, जिथे इराणी चषक सामना खेळवला जाणार होता. मात्र लखनऊला जात असताना पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर त्यांची कार दुभाजकावर आदळली. या अपघातात मुशीर खानची मान फ्रॅक्चर झाली असून वडिलांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुशीर खानच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे. एमसीएच्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, मुशीर प्रवासासाठी फिट होताच, त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले जाईल. मानेच्या या दुखापतीमुळे मुशीर खानला जवळपास 3 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
इशान किशनचे भारतीय संघातील पुनरागमन लांबणीवर, ‘या’ कारणामुळे मिळाले संकेत!
INDvsBAN : अभिषेक शर्मा अन् ‘या’ खेळाडूची सलामी जोडी ठरू शकते धोकादायक; माजी निवडकर्त्यांचे मत
SL vs NZ; कोण आहे हा फिरकीपटू? पदार्पण सामन्यातच घेतल्या 9 विकेट्स