येत्या २० फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जगभरातील १०९७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. मात्र बांगलादेश संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज मुशफीकुर रहीम याने यंदाच्या आयपीएलमध्ये लिलावासाठी नाव नोंदवले नाही आहे. गेल्या १३ आयपीएल सत्रात मुशफिकुर रहीमने नाव नोंदवले होते परंतु त्याला एकाही आयपीएल संघात सामील करून घेतल्या गेले नाही. याच कारणास्तव त्याने या वर्षी आयपीएल मध्ये नाव नोंदवले नाही.
बांगलादेश संघासाठी केली उत्कृष्ट कामगिरी
मुशफिकुर रहीम याला बांगलादेश संघाचा दिग्गज खेळाडू मानले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून तो बांगलादेश संघाचा भाग आहे. तसेच त्याने बांगलादेश संघासाठी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. विशेषतः वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करण्यासाठी रहीम प्रसिद्ध आहे.
आयपीएल लिलाव २०२१
आयपीएल लिलावासाठी यंदा जगभरातून १०९७ खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. यात ८१४ भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे तर २८३ परदेशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यापैकी २१ खेळाडूंनी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले आहे. तसेच ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क याचा समावेश नाही आहे. या लिलावात एकूण ११ खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत २ करोड इतकी आहे. यात ग्लेन मॅक्सवेल , स्टीव स्मिथ , शकीब अल हसन, हरभजन सिंग आणि केदार जाधव यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
जस्टिन लँगर यांच्या समर्थनात धावला स्टीव स्मिथ, म्हणाला
हम भी पेले गये थे, तुम भी पेले जाओगे! रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर भन्नाट मिम्स व्हायरल
विजय हजारे ट्रॉफीसाठी बडोदा संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या स्टार खेळाडूकडे कर्णधारपद






