भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर पूर्णपणे दबाव बनवलेला आहे.भारतीय संघासाठी हा सामना अतिशय कठीण ठरत आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर त्याच्या प्रत्युतरात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली.
भारताचे पहिले 4 फलंदाज केवळ 73 धावांवर बाद होते, मात्र यानंतर चेतेश्वर पुजारा व रिषभ पंतने शानदार शतकीय भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान रिषभ पंतने इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच विरुद्ध आक्रमक फटके मारले. यानंतर अनेक क्रिकेट फॅन्सनी ट्विटर वर जॅक लीचची तुलना नेथन लायन सोबत केली आहे.
पंतने लीचच्या पहिल्या 8 चेंडूवर तब्बल 28 धावा ठोकल्या होत्या. पंतने आपल्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार ठोकले व हे सर्व लीच विरुद्धच होते. पंतच्या या आक्रमक फलंदाजीमुळे लीचने 11 षटकात तब्बल 84 धावा खर्च केल्या. पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेथन लायन विरुद्ध असेच आक्रमक फटके मारले होते, व त्यामुळेच ट्विटर वर लायनचे मीम्स वायरल होत होते. लीच विरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पंत शतकीय खेळी करणार असे वाटत असतानाच तो बाद झाला. पंतने 88 चेंडूत 9 चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 91 धावांंची खेळी केली.
https://twitter.com/51Biased/status/1358421725088686081
Pant hitting Jack Leach the same way he PUNISHED Nathan Lyon!! Maybe coz they look alike!!#RishabhPant#INDvsENG
— Shubham Ghorpade (@TUnorthodox17) February 7, 2021
It's not Rishabh Pant's fault he sees Nathan Lyon in Jack Leach. #INDvENG pic.twitter.com/Jf7sNed8gH
— ASHISH (∎, ∆) (@ashishknows) February 7, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता तिसरा दिवस देखील इंग्लडच्या बाजूने झुकला. दिवस अखेर भारताने आपल्या डावात 6 गडी गमावत 257 धावा केलेल्या आहेत. भारताकडून केवळ रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी काहीसा संघर्ष केला. पुजाराने 73 धावांची खेळी केली. भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अजूनही 321 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव गाजवला तो कर्णधार जो रुटने. रुटने 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली.त्याला डॉम सिबली (87) व बेन स्टोक्सने (82) उत्तम साथ दिली. दरम्यान भारतीय संघाची पुढील वाट अतिशय खडतर मानली जात आहे. भारताला पराभव टाळण्यासाठी सामन्याच्या चौथ्या दिवशी अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी
अरेरे! चेतेश्वर पुजारा झाला दुर्दैवी पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ
अबुधाबी टी१० लीग : दिल्ली बुल्सवर मात करत नॉदर्न वॉरियर्सने पटकावले विजेतेपद






