भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका (19 सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. या आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तत्पूर्वी बांगलादेशचा एक खेळाडू असा आहे, ज्याने भारतीय संघाविरूद्ध आतापर्यंत बांगलादेशसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) या खेळाडूचे नाव असून तो 2005 पासून बांगलादेशसाठी कसोटी सामने खेळत आहे. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत. 15 डावात त्याने 604 धावा केल्या आहेत. दरम्यान रहीमने भारताविरुद्ध 2 शतके आणि 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. भारत-बांगलादेश कसोटी मालिकेतील आजपर्यंतच्या इतिहासात रहीम हा बांगलादेशसाठी भारताविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
मुशफिकुर रहीमच्या आंतरराष्ठ्रीय कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने बांगलादेशसाठी 90 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 39.01च्या सरासरीने 5,892 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 27 अर्धशतके आणि 11 शतके आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 219 राहिली आहे.
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
दमदार प्रदर्शन करूनही बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत ‘या’ 5 खेळाडूंचा पत्ता कट
भारताच्या कसोटी संघातून अनुभवी मोहम्मद शमीला डच्चू, ‘दादा’ने सांगितले वगळण्यामागचे कारण
सुरक्षा घेरा तोडून आझमला भेटायला पोहोचला चाहता, त्यानंतर रौफने असे काही करत जिंकली मनं