---Advertisement---

विराट कोहली, युवराज सिंगने एबी डिविलियर्सला असा दिला पाठिंबा

On: शनिवार, जुलै 13, 2019 2:27 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला 2019 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्याची ऑफर दिल्याचे मागील महिन्यात चर्चेत आले होते. त्यामुळे डिविलियर्सही बऱ्याच दिवस चर्चेत होता. पण त्याने शुक्रवारी(12 जूलै) सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत या प्रकरणाबाबत खूलासा केला आहे.

त्याने यामध्ये स्पष्ट केले आहे की त्याने विश्वचषकासाठी संघात संधी मिळावी म्हणून दक्षिण आफ्रिका बोर्डाशी कोणताही अधिकृत संपर्क साधला नव्हता.

पण त्याचबरोबर त्याने विश्वचषकासाठी संघ जाहिर होण्याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला फोन केला असल्याचे मान्य केले आहे. पण हा फोन सहज बोलण्यासाठी करण्यात आल्याचे त्याने सांगितले होते.

तसेच डिविलियर्सने हे देखील सांगितले की त्याने कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर त्याने म्हटले आहे की विश्वचषकातील समावेशाबाबत जर संघाला गरज असेल तरच फक्त पुनरागमन करण्याची तयारी दाखवली होती, पण कोणतीही मागणी केली नव्हती.

डिविलियर्सने फाफबरोबर झालेले वैयक्तिक संभाषण मीडियामध्ये त्याच्याकडून किंवा त्याच्या संबंधीत व्यक्तींकडून किंवा फाफकडून उघड झाले नसल्याचे देखील सांगितले आहे.

डिविलियर्सच्या या पोस्टनंतर त्याला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने पाठिंबा दिला आहे. त्यांनी डिविलियर्सच्या इंस्टाग्रामवरील पोस्टवर पाठिंबा देणारी प्रतिक्रीया दिली आहेे.

विराटने म्हटले आहे की ‘माझ्या भावा, मला माहित असलेल्या व्यक्तींपैकी तू सर्वात इमानदार आणि समर्पित व्यक्ती आहेस. तूझ्याबरोबर जे झाले ते पाहणे दुर्दैवी आहे. पण हे लक्षात ठेव आम्ही तूझ्याबरोबर आहोत आणि तूझ्यावर विश्वास ठेवतो. तूझ्या व्यक्तीगत आयुष्यात लोकांनी डोकावणे दु:खद आहे. तूला आणि तूझ्या कुटुंबाला शक्ती आणि खूप प्रेम. मी आणि अनुष्का नेहमी तूमच्या बरोबर आहोत.’

Screengrab: Instagram/abdevilliers17

तसेच युवराजने म्हटले आहे की ‘माझ्या मित्रा, मी ज्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो त्यांच्यापैकी तू एक सर्वात चांगला व्यक्ती आहेस. तूझ्याशिवाय दक्षिण आफ्रिकेला हा विश्वचषक जिंकण्याची कोणतीही संधी नव्हती. तू संघात नसणे हे तूझ्या देशाच्या संघाचा तोटा होता, तूझा नाही. जेवढा मोठा खेळाडू तेवढी जास्त टीका होत असते. आम्हाला सर्वांना माहित आहे की तू सज्जन व्यक्ती आहेस.’

Screengrab: Instagram/abdevilliers17

डिविलियर्स, युवराज आणि विराट हे याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून एकत्र खेळले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ऍडम गिलख्रिस्टने एमएस धोनीला दिला हा खास संदेश

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..

टेनिसप्रेमींना विठ्ठलाचे रूप पाहिल्याचे सुख देणारा सामना!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment