इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये बुधवारी (१८ मे) ६६ वा सामना प्रचंड रोमांचकारी झाला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने २ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, असे असले तरी, कोलकातासाठी रिंकू सिंग याने शानदार कामगिरी करत प्रभाव पाडला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने २० षटकांत बिनबाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकांत ८ बाद २०८ धावा करता आल्या. कोलकाताकडून रिंकू सिंगने (Rinku Singh) अखेरीस १५ चेंडूत ४० धावांची ताबडतोड खेळी करताना विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अपयश आले. पण, त्याने या आयपीएल हंगामात आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. दरम्यान, त्याचा आत्तापर्यंतचा सोपा नव्हता.
रिंकू सिंगला एका मोठ्या दुखापतीमुळे काही महिने क्रिकेट खेळता आले नव्हते. त्यावेळी त्याच्या वडीलांनी २-३ दिवस जेवण सोडले होते. कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिंकू सिंगने आपल्या क्रिकेट प्रवासाबद्दल सांगितले आहे.
तो म्हणाला, ‘पाच वर्षे माझ्यासाठी कठीण होते. मला पहिल्यांदा केकेआरने निवडले होते. जेव्हा मला खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा मी चांगले प्रदर्शन करू शकलो नाही. तरीही कोलकाताने माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुढील काही हंगामांसाठी संघात कायम केले.’
तसेत रिंकू सिंगने सांगितले, ‘मी माझ्या शारिरयष्टीनुसार कठोर परिश्रम केले. संघानेही मला कमजोर समजले नाही. मागील वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. विजय हजारे ट्रॉफीदरम्यान दुहेरी धावा घेताना मला गुडघ्याला दुखापत झाली. जेव्हा मी पडलो, तेव्हा मी आयपीएलबद्दल विचार केला होता. मला सांगितले होते की, मला शस्त्रक्रियेची गरज आहे आणि मला बरे होण्यासाठी ६-७ महिने लागणार आहे.’
तो म्हणाला, ‘मी इतके दिवस क्रिकेटपासून दूर राहून खूश नव्हतो. माझ्या वडीलांनी २-३ दिवस काही खाल्ले नव्हते. मी माझ्या वडीलांना सांगितले की, दुखापत केवळ क्रिकेटचा भाग आहे. मी माझ्या कुटुंबात कमावणारा व्यक्ती आहे. जेव्हा आशा गोष्टी घडतात, तेव्हा चिंता वाटणे साहजिक आहे. मी थोडा निराश होतो. पण मला माहित होते की मी लवकर बरा होईल, माझ्यात खूप आत्मविश्वास होता.’
रिंकू सिंगने आयपीएल २०२२ हंगामात ३४.८० च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPLची फायनल बघायला मैदानावर जायचा विचार करताय? तिकीटाचे दर पाहून म्हणाल, आपला टीव्हीच बरा
रिकी पॉटिंगने दिलेला शब्द पाळला आणि आवेश खान आयपीएल स्टार झाला
फॉर्म गेल्यानंतरही तोच काळ सर्वात आनंदी असल्याचं म्हणतोय विराट, वाचा कारण