---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा हॅट्रिक हिरो राजकोट बाॅय जड्डूचा फॅन!

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 4:00 PM
---Advertisement---

काल (21 फेब्रुवारी) जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना (1st Match) पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी जिंकला. या सामन्यात हॅट्रिकसह 5 विकेट्स घेत ऍश्टन एगरने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर बोलताना ऍश्टन एगरने (Ashton Agar) भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) ‘रॉकस्टार’ म्हणत आपला आवडता खेळाडू म्हटले आहे.

त्याचबरोबर जडेजाशी चर्चा करून खूप फायदा झाला असल्याचेही एगर म्हणाला. मागील महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यावेळी एगरला जडेजाचा सल्ला उपयोगी ठरला.

“भारताविरुद्ध वनडे मालिकेनंतर मी जडेजाबरोबर खूप चर्चा केली. फिरकी गोलंदाजीबद्दल त्याच्याशी चर्चा करून मला खूप प्रेरणा मिळाली,” असे जडेजाबद्दल बोलताना एगर म्हणाला.

“जडेजा हा माझा जगातील सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. मला त्याच्याप्रमाणे खेळायचे आहे. तो एक रॉकस्टार आहे. त्याला खेळताना पाहून माझ्यातील आत्मविश्वास वाढत जातो. फलंदाजीबाबत त्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. तसेच तो मैदानावर फलंदाजी करण्यासाठी याच सकारात्मकतेने उतरतो,” असेही यावेळी एगर म्हणाला.

एगर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) केली होती.

https://twitter.com/Maha_Sports/status/1231124130625355777

https://twitter.com/Maha_Sports/status/1231112567021604869

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---