---Advertisement---

“माझं काम सोपं झालंय…” सूर्यकुमारच्या नेतृत्वाची गंभीरला भुरळ, कौतुक करताना व्यक्त केली मोठी प्रतिक्रिया!

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 7:20 PM
---Advertisement---

भारतीय संघ टी-२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून त्यांच्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, परंतु टी-२० फॉरमॅटमधील संघाची कामगिरी इतकी दमदार आहे की कोणालाही बोलण्याची संधी मिळत नाही. संघाच्या या यशाचे श्रेय गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवला दिले असून त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

​’स्पोर्ट्स स्टार’शी बोलताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला, “सूर्याने टी-२० फॉरमॅटमध्ये माझे आयुष्य खूप सोपे केले आहे. तो एक अप्रतिम नेता आहे. प्रशिक्षक म्हणून तुमच्या मनात अनेक गोष्टी सुरू असतात, पण जेव्हा तुम्हाला माहित असते की तुमचा कर्णधार संघातील वातावरण सकारात्मक ठेवेल, तेव्हा तुम्हाला मोठा दिलासा मिळतो. कोणत्याही प्रशिक्षकासाठी हे एका स्वप्नासारखे आहे.”

​टी-२० विश्वचषक २०२६ च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडलेला दिसत होता, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने एका धडाकेबाज खेळीच्या जोरावर संघाला संकटातून बाहेर काढले. त्याने ८४ धावांची खेळी करून डळमळीत झालेला डाव सावरला. अमेरिकेविरुद्धच्या (USA) सामन्यातील सूर्याचे हे सलग दुसरे अर्धशतक होते. २०२४ मध्येही त्याने या संघाविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु २०२६ मध्ये आतापर्यंत त्याने ४ अर्धशतके झळकावली आहेत. फलंदाजीसोबतच ज्या पद्धतीने त्याने कर्णधार म्हणून संघ हाताळला आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---