---Advertisement---

‘माझं नाव नेहमी विकलं जातं’, गुजरात टायटन्सला फायलनमध्ये पोहोचवल्यानंतर असे का म्हणाला हार्दिक पंड्या?

On: बुधवार, मे 25, 2022 9:25 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

पंधराव्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम फेरीत एका संघाने आपली जागा पक्की केली आहे. मंगळवारी (२४मे) झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे.

हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) राजस्थान सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “लोक चर्चा तर करणारच. हे त्यांचे काम आहे. मी काहीच करू शकत नाही.” तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, “माझे नाव नेहमीच चर्चेत (विकले जाते) असते याविषयी मला वाईट वाटत नाही.” ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात हार्दिकने २७ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी डेविड मिलरसोबत नाबाद शतकीय भागीदारी केली. त्याचबरोबर त्याने गोलदांजीत देवदत्त पडिक्कलला त्रिफळाचीतही केले.

हार्दिकची मोजकीच आंतरराष्ट्रीय कामगिरी, दुखापत असा कोणत्या ना कोणत्या कारणाने तो नेहमीच चर्चेत असतो. या गोष्टींचा सामना त्याने नेहमीच हसतमुखाने केला. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात संघाने त्याच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गुजरातने या आयपीएल हंगामातील १४ साखळी सामन्यात सर्वाधिक असे १० विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान गाठले.

आयपीएल २०२२च्या लिलावात मुंबईने हार्दिकला मुक्त केले होते. त्यावेळी गुजरात संघाने त्याला १५ कोटी रूपयांमध्ये संघात विकत घेतले. यावेळी त्याला दिलेल्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली आहे. त्याला नेतृत्व दिले यावरही प्रश्न निर्माण केले जात होते.

“एमएस धोनीने (MS Dhoni) माझ्या जीवनात खूप महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याच्याकडून जे शिकायला मिळाले त्याचा मला चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या संकटांचा सामना मी हसतमुखाने करतो”, असेही हार्दिकने पुढे म्हटले आहे.

सन २०१५च्या आयपीएलमध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण केले होते. यामध्ये त्याने उत्तम कामगिरी केल्याने त्याची २०१६मध्ये भारतीय संघात निवड झाली. त्याच्या अष्टपैलू कौशल्याने त्याची कपिल देवसोबत तुलना होत होती. नंंतर मात्र २०१९मध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये त्याने महिलांविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याने त्याच्यावर चाहते चांगलेच भडकले होते. यानंतर बीसीसीआयची (भारतीय क्रिकेट बोर्ड) त्याने माफी मागितली.

भारतीय संघात हार्दिक नेहमीच आत-बाहेर असतो. सध्या त्याची घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना २०२१मध्ये खेळला होता. दुबईमध्ये झालेल्या या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात त्याने दुखापतीमुळे गोलंदाजी केली नव्हती.

आयपीएल २०२२च्या हंगामात हार्दिकने १४ सामन्यांत ४५.३०च्या सरासरीने ४५३ धावा केल्या, तर ५ विकेट्सही घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आयपीएल फायनलला अजून चार दिवस बाकी, मग काय करणार? पाहा गुजरातच्या ट्वीटवर काय म्हणाला राशिद खान

बटलरच्या वादळी खेळीने रचला जबरदस्त विक्रम; ठरला आयपीएलच्या इतिहासातील सातवाच फलंदाज

‘माणसांकडूनच चूका होतात’, गांगुलीकडून विराट-रोहितची पाठराखण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---