भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी हा भारतीय संघाचा आजपर्यतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार राहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर कडून टिका होत आहेत.
गंभीरने 2012 च्या सीबी मालिकेत त्यावेळेचा भारताचा कर्णधार धोनीने घेतलेल्या निर्णयांवर टीका केली आहे. ही वनडे मालिका भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती.
त्यावेळी भारतीय संघात गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर असे तीन सलामीवीर होते. त्यामुळे धोनीने दोन सलामीवीरांनाच संघात संधी देण्याचे ठरवले, कारण 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याला युवा खेळाडूंना संधी द्यायची होती. पण हा निर्णय गंभीरला पटला नव्हता.
“माझे आणि धोनीचे नाते चांगले आहे. पण माझे विचार हे माझेच असून ते कधीच बदलणार नाही. मी हे फक्त धोनीबद्दल नाही तर विराट कोहली बद्दलही माझे विचार कधीच बदलणार नाही”, असे गंभीर न्यूज 18 शी बोलताना म्हणाला.
“संघ हा काही फक्त कर्णधाराचा नाही. त्याचप्रमाणे आत्ताचा संघ हा काही विराटचा नसून तो चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांचाही आहे”, असेही गंभीर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–माझं काय चुकलं सांगा, आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूचा त्रागा
–पंचांवर ओरडणं जगातील सर्वात दिग्गज अष्टपैलू खेळाडूला पडले चांगलेच महागात
–…तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीची होणार सुट्टी