आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी देखील आयपीएलचे आयोजन बंद दाराआड व विना प्रेक्षक खेळविण्यात येतेय. त्याचवेळी, राष्ट्रीय उत्तेजकद्रव्य विरोधी संघटना म्हणजे नाडा खेळाडूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेणार असल्याचे कळविण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ही चाचणी कमी खेळाडूंची घेण्यात येईल.
इतक्या खेळाडूंची होऊ शकते चाचणी
गेल्या वर्षी युएईमध्ये नाडाने घेतलेल्या नमुन्यांपेक्षा कमी नमुने घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नाडाने यूएई येथे ५० पेक्षा जास्त डोपचे नमुने घेतले होते. परंतु, यावेळी केवळ ३० ते ३५ नमुने घेतले जातील. मात्र, नाडाच्या रडारवर यावेळी आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे क्रिकेटपटूही असतील. सामन्यादरम्यान, लॉटरीच्या आधारे क्रिकेटपटूंचे नमूने घेण्यात येतील. काही नमुने स्पर्धेनंतरही घेण्यात येऊ शकतात.
या कारणाने कमी खेळाडूंची चाचणी
गेल्या वर्षी युएईमध्ये नाडाच्या पथकाने तिन्ही ठिकाणी जाऊन नमुने घेतले होते. मात्र यावेळी सहापैकी तीन केंद्रांवर नमुने घेण्यात येणार आहेत. प्ले ऑफच्यादरम्यान नाडा नमुने घेण्याची शक्यता आहे. मागील आयपीएलदरम्यान असे सांगण्यात आले होते की, १२० ते १५० क्रिकेटपटूंचे नमुने घेण्यात येतील. परंतु, अखेरच्या वेळी त्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली. यावेळी ही संख्या आणखी कमी करण्यात येईल. क्रिकेटपटूंचे नमुने सकारात्मक येत नसल्याने नाडाने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून समजते. युएईमधील आयपीएलमध्ये एकही क्रिकेटपटू डोपिंगमध्ये सामील नव्हता.
या ठिकाणी होणार तपासणी
खेळाडूंच्या घेतलेल्या चाचण्यांची तपासणी बेल्जियमच्या गेंट येथे केली जाऊ शकते. खेळाडूंच्या चाचण्यांसाठी नाडाच्या अधिकाऱ्यांना बायोबबलचा भाग व्हावे लागेल. खेळाडूंच्या चाचण्यांसाठी नाडाने स्वीकारलेला लॉटरीचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ‘इतक्या’ दिवसांनंतर मैदानात उतरला भज्जी, सहकाऱ्यांनी केले कौतुक
बधाई हो भज्जी! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव क्रिकेटपटू
राणाजी रॉक्स! रोहित आणि वॉटसननंतर अशी कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा फलंदाज