fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

यूएस ओपन: राफेल नदालने जिंकले कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम

आज स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकत कारकिर्दीतील 19 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने अंतिम फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 अशा फरकाने 5 सेटमध्ये पराभव करत चौथ्यांदा यूएस ओपनचे विजेतेपद मिळवले.

4 तास 49 मिनिटे चाललेल्या या अंतिम लढतीत नदालने पहिले दोन सेट जिंकून आघाडी मिळवली होती. मात्र तिसऱ्या सेटमध्ये 23 वर्षीय मेदवेदेवने चांगले पुनरागमन करत हा सेट 7-5 असा जिंकला आणि सामन्यातील आव्हान कायम ठेवले.

मेदवेदेवने पुढे चौथा सेटही 4-6 ने जिंकत हा सामना पाचव्या सेटपर्यंत नेला. पण पाचव्या सेटमध्ये नदालने मदवेदेवर मात करत विजेतेपदावर नाव कोरले.

हे विजेतेपद जिंकल्यानंतर नदाल भावूक झाला होता. यावेळी त्याला त्याचे अनंदाश्रूही थांबवता आले नाही. नदाल म्हणाला, ‘हा विजय माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता. हा नाट्यपूर्ण सामना होता. मी खूप भावूक झालो आहे.’

‘माझ्यासाठी ही अंतिम लढत भावनिक होती. डॅनिल हा केवळ 23 वर्षांचा आहे आणि त्याने ज्याप्रकारे लढत दिली ते शानदार होते. त्याला अशा अनेक संधी मिळतील.’

त्याचबरोबर नदाल म्हणाला, ‘मी खूप आनंदी आहे. ही ट्रॉफी माझ्यासाठी आज सर्वकाही आहे.’

नदालने कारकिर्दीतील 19 वे ग्रँडस्लॅम जिंकल्याने त्याच्या आणि रॉजर फेडररमधील ग्रँडस्लॅम विजेतेपदांचे अंतर कमी झाले आहे. आत्तापर्यंत टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदे फेडररने मिळवली आहेत. फेडररने 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवले आहे.

तसेच या यादीत फेडरर, नदालच्या पाठोपाठ सार्बियाचा नोव्हाक जोकोविच असून त्याने 16 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवली आहेत.

त्याचबरोबर नदाल हा वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिपटूही ठरला आहे. त्याचे वयाच्या तिशीनंतरचे हे 5 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

तसेच त्याने यूएस ओपनची चार विजेतेपदे मिळवण्याच्या जॉन मॅकेन्रो यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांपेक्षा केवळ फेडरर, जिमी कॉनर्स आणि सँप्रास यांनी जास्त यूएस ओपनची विजेतेपदे मिळवली आहे. त्यांनी प्रत्येकी 5 वेळा यूएस ओपनचे विजेतेपद मिळवले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

२ वेळा संधी मिळूनही पॉटिंग, क्लार्कला जे जमले नाही ते टिम पेनने पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवले

You might also like