न्यूझीलंड संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांतील पहिला कसोटी सामना सिल्हेटमध्ये खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) सुरू झाला असून सध्या बांगलादेश 205 धावांनी आघाडीवर आहे. नजमुल हुसेन शांतो याने गुरुवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.
उभय संघांतील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या 3 बाद 212 होती. त्याआधी पहिल्या डावात बांगलादेशने 310, तर न्यूझीलंडने 7 धावांची आघाडी घेत 317 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडची धावसंख्या पहिल्या डावात 8 बाद 266 होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने कायल जेमिन्सन (Kyle Jamieson) आणि टिम साऊदी (Tim Southee) यांच्या विकेट्स घेतल्या न्यूझीलंडला 317 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात बांगलादेशसाठी दुसऱ्या डावात कर्णधारा नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याने अप्रतिम शतक मारले.
न्यूझीलंडला निर्धारित धावसंख्येवर रोखण्यासाठी तैजुल इस्लाम याचे योगदान महत्वाचे ठरले. तैजुलने सर्वाधिक 4 विकेट्स या सामन्यात नावावर केल्या. तसेच मोमिनुल हक यानेही तीन विकेट्स घेतल्या. शोरिफूल इस्लाम, मेहदी हसन मिराझ आणि नईम हसन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट या डावात घेतली.
बांगलादेश संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर महमुदुल हसन जॉय आणि झाकीर हसन यांनी अनुक्रमे 8 आणि 17 धावा करून विकेट गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार शांतो फलंदाजीला आला. त्याने संयमी खेळी करत शतकापर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाखेर शांतो 193 चेंडू खेळला अशून 104* धावा करून खेळपट्टीवर कायम आहे. मोमिनुल हसन याने चौथ्या क्रमांकावर खेळताना 40 धावा करून विकेट गमावली. तर मुशफिकूर रहिम 43* धावांसह नाबाद आहे.
पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन (104) यानेही शतकी खेली केली होती. अशात सामना जिंकण्यासाठी चौथ्या दिवसात बांगलादेशचे प्रदर्शन निर्णायक ठरेल. सध्या बांगलादेशने 212 धावांपर्यंत मजल मारली असून अजून 7 विकेट्स बाकी आहेत. अशात न्यूझीलंडला बांगलादेशकडून विजयासाठी मोठे आव्हान मिळू शकते. (Najmul Hussain Shanto scored an incredible century in the first Test match against New Zealand)
महत्वाच्या बातम्या –
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड