---Advertisement---

सॅल्यूट सेलिब्रेशनची कॉपी करण्याबद्दल शमीला शेल्डन कॉट्रेलने दिले हिंदीत उत्तर

On: शनिवार, जून 29, 2019 1:13 PM
---Advertisement---

मँचेस्टर। गुरुवारी(27 जून) 2019 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात भारताने विंडीज विरुद्ध 125 धावांनी विजय मिळवून या स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात मोहम्मद शमीने 6.2 षटके गोलंदाजी करताना 16 धावा देत 4 विकेट्स घेउन महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याच्या या कामगिरीबरोबरच त्याने या सामन्यात विंडीजचा शेल्डन कॉट्रेल बाद झाल्यानंतर सलामी ठोकत केलेल्या सेलिब्रेशन मोठी चर्चा झाली आहे. याबद्दल एका मीडिया हाऊसने सोशल मीडियावर प्रश्न विचारला की ही फक्त मजा होती की आर्मीचा अनादर होता.

यावर कॉट्रेलने उत्तर दिले आहे की ही मजा होती. तसेच त्याने भारतीय गोलदाजांचेही कौतुक केले. त्याचबरोबर त्याने गमतीने हिंदीमध्येही शमीच्या सॅल्यूट सेलिब्रशनला उत्तर दिले. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘नकल करना ही सबसे बड़ी चापलूसी है।’

कॉट्रेल हा जेव्हाही गोलंदाजी करताना विकेट घेतो तेव्हा तो सलामी ठोकत सेलिब्रेशन करतो. या सामन्यातही त्याने 49 व्या षटकात शमीला जेव्हा बाद केले तेव्हा सलामी देत सेलिब्रशन केले होते.

त्यानंतर जेव्हा विंडीज संघ भारताने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता तेव्हा भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 30 व्या षटकात कॉट्रेलला पायचित बाद केल्यानंतर शमीने कॉट्रेलच्या सलामीचे अनुकरण करत सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना  50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची तर एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विंडीजकडून गोलंदाजीत केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

त्यानंतर भारताने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 34.2 षटकात सर्वबाद 143 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना हा पराभव स्विकारावा लागला. तसेच या पराभवामुळे त्यांचे या विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.

https://twitter.com/MSDivyanshu/status/1144287724410564608

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: आज पावसामुळे नाही तर चक्क मधमाशांमुळे थांबला दक्षिण आफ्रिका-श्रीलंकामधील सामना

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत; बीसीसीआयने शेअर केला फोटो

‘सामनावीर’ कोहलीचे नाव सचिन-जयसुर्या सारख्या दिग्गजांच्या यादीत आता सन्मानाने घेतले जाणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment