---Advertisement---

कसोटीमध्ये क्रमांक, नाव असलेली जर्सी घालण्यावर भडकला हा माजी यष्टीरक्षक

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2019 7:33 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात कालपासून(1ऑगस्ट) सुरु झालेल्या ऍशेस मालिकेपासून कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू क्रमांक आणि नाव असलेली जर्सी घालून मैदानात उतरले आहेत.

मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने कसोटी जर्सीवर नाव आणि क्रमांक असणे, हे मुर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. त्याने याबाबत दोन ट्विट केले आहेत. त्याने पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘माफ करा, तूम्ही याला जूनी फॅशन म्हणू शकता पण नाव आणि क्रमांक (जर्सीवर) चांगले वाटत नाही.’

https://twitter.com/gilly381/status/1156869500462960640

गिलख्रिस्टने यानंतर लगेचच केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘खरंतर, मी माझी माफी परत घेतो. नाव आणि क्रमांक (जर्सीवर) मुर्खपणाचे आहे. ऍशेस मालिकेचा सर्वांनी आनंद घ्या.’

https://twitter.com/gilly381/status/1156870408726970368

क्रमांक आणि नाव जर्सीवर असल्याने चाहत्यांना खेळाडू लवकर ओळखता येतील आणि चाहते खेळाडूंशी जोडले जातील म्हणून आयसीसीने हा पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की खेळाडूंनी नावे आणि क्रमांक पाठीवर असणारी जर्सी घातली आहेत. याआधी फक्त वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये नावे आणि क्रमांक पाठीवर असलेली जर्सी घालून खेळाडू खेळत होते.

आता कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सहभागी संघ क्रमांक आणि नाव असलेली कसोटी जर्सी घालून खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडनेही कसोटी चॅम्पियनशीपसाठी त्यांच्या खेळाडूंनी क्रमांक आणि नाव असलेली कसोटी जर्सी घातलेले फोटो शेअर केले होते.

2 वर्षे चालणारी ही कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात पार पडणार आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

या संपूर्ण स्पर्धेत एकूण 27 द्विपक्षीय मालिका होणार आहेत. तर एकूण 71 कसोटी सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर पार पडणार आहे.

https://twitter.com/englandcricket/status/1153366494505574400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1153366494505574400&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fashes-2019-englands-test-team-to-wear-names-and-numbers-on-jerseys%2F

https://twitter.com/ICC/status/1153583030960840704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1153583030960840704&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fashes-2019-englands-test-team-to-wear-names-and-numbers-on-jerseys%2F

https://twitter.com/ICC/status/1155742508112064513

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा उद्यापासून सुरु होणारा वेस्ट इंडीज दौरा

विराट कोहलीच्या मदतीला धावून आला भारताचा हा दिग्गज कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment