टी२० विश्वचषक २०२१ पात्रता फेरीच्या सातव्या सामन्यात नामिबियाने नेदरलँडचा ६ गडी राखून पराभव केला आणि सुपर १२ च्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नेदरलँड्स संघाचा पराभव झाल्याने सुपर १२ च्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाले आहेत. अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या अ गटातील सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत चार गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात नामिबियाने १९ षटकांत चार गडी गमावून विजय मिळवला आहे.
नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मॅक्स ओडोडने स्टीफन मायबर्गसोबत पहिल्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. मात्र, सहाव्या षटकात मायबर्ग आणि आठव्या षटकात रुलोफ व्हॅन डर मर्वे (६) बाद झाल्याने नेदरलँडला दुहेरी धक्का बसला. येथून मॅक्स ओडोडने तिसऱ्या विकेटसाठी कॉलिन एकरमन (३५) सोबत ८२ धावा जोडल्या आणि यादरम्यान त्याने सलग दुसरे अर्धशतकही पूर्ण केले.
मॅक्स ओडोडने ५६ चेंडूत ७० धावा केल्या आणि शेवटच्या षटकात धावबाद झाला. स्कॉट एडवर्ड्सने ११ चेंडूत २१ धावांची झटपट खेळी केली आणि संघाला १६० धावांच्या पुढे नेले. लोगान व्हॅन बीक २ धावांवर नाबाद राहिला. नामिबियासाठी यान फ्रायलिंकने दोन आणि डेव्हिड विसेने एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने झटपट सुरुवात केली. पण त्यांना पाचव्या षटकात संघाच्या ३४ धावा झाल्या असतांना पहिला धक्का बसला. जेन ग्रीन (१५) धावा करून बाद झाला. यानंतर क्रेग विल्यम्स (११) आठव्या षटकात ४७ धावांवर बाद झाला आणि स्टीफन बर्ड (१९) देखील नवव्या षटकात संघाच्या ५२ धावा झाल्या असतांना बाद झाला. पण, येथून डेव्हिड विसेने गेरहार्ड इरास्मससह (३२) चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची विजयी भागीदारी केली. गेरहार्ड इरास्मस १७ व्या षटकात संघाच्या १४५ धावांवर बाद झाला.
डेविड विसेने ४० चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली आणि जेजे स्मित (१४*) सोबत त्याने संघाला एक षटक शिल्लक ठेवून दणदणीत विजय मिळवून दिला. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन, टीम व्हॅन डेर गुगेन, पीटर सीलार आणि कॉलिन एकरमन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आता, नामिबियाचा पुढील सामना आयर्लंडशी होईल आणि नेदरलँडचा सामना २२ ऑक्टोबरला पहिल्या फेरीच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेशी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध २००७ची फायनल खेळणाऱ्या शोएब, हाफिजला मिळणार संधी! पाहा पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
क्यूट जोडी! हार्दिक आणि नताशाने पुन्हा सेट केले ‘कपल गोल्स’, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
डेविड वॉर्नरचा भारतीय सलामीवीर रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण