---Advertisement---

डेविड वॉर्नरचा भारतीय सलामीवीर रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 9:22 PM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामने येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तसेच भारतीय संघाची पहिलीच लढत पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो. त्याचे इंस्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोवर्स आहेत, ज्यांचे मनोरंजन करण्यासाठी रोहित शर्मा आपल्या दैनंदिन जीवनातील फोटो आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. असाच एक व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

रोहित शर्माने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो भारतीय संघाच्या नवीन जर्सीमध्ये दिसून येत आहे. त्याने या व्हिडिओमध्ये हटक्या स्टाईलमध्ये जर्सी घातल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने व्हिडिओच्या सुरुवातीला ही जर्सी हातात धरली होती. त्यानंतर त्याने ती जर्सी बेडवर ठेवली. इतक्यात तो बेडवर उडी मारतो अणि जर्सी त्याच्या अंगावर असते. या व्हिडिओवर त्याने हटके कॅप्शनदेखील दिले आहे. रोहितला या नव्या जर्सीमध्ये पाहून चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/CVKy6I7qQrt/?utm_medium=copy_link

या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर दिग्गज खेळाडूंनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव याने प्रतिक्रीया देत, “वेरी क्यूट…” असे लिहून पुढे हसायच्या ईमोजी टाकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज डेविड वॉर्नर याने मजेशीर प्रतिक्रिया देत, “तू माझ्या टिकटॉक व्हिडिओची कॉपी केली आहेस,” असे लिहिले आहे. तर युझवेंद्र चहलने आपली प्रतिक्रिया देत “पुअर बेड,”असे लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल पाच वर्षानंतर विराटने केली गोलंदाजी; ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया

‘माझ्या घरातील सर्वात धारदार चाकूचे नाव वीरू’; दिग्गज गोलंदाजाकडून सेहवागला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

टी२० विश्वचषकात हा फलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ‘हुकमी एक्का’; युएईत नेहमीच ठरला यशस्वी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---