आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघाने दुबई येथे दोन सराव सामने खेळले. बुधवारी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नऊ गड्यांनी पराभूत करत आपण या स्पर्धेसाठी तयार असल्याचे संकेत दिले. दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याने बऱ्याच कालावधीनंतर गोलंदाजी करताना चाहत्यांचे मने जिंकली.
विराटने केली गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व उपकर्णधार रोहित शर्माने केले. मात्र, अंतिम अकरामध्ये नाव नसलेल्या विराट कोहली याने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली. त्याने जवळपास पाच वर्षानंतर गोलंदाजी करताना दोन षटके टाकत १२ धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजीनंतर सोशल मीडियावर त्याबाबत अनेक ट्वीट येत आहेत. विराटची गोलंदाजी पाहून एका चाहत्याने ट्विट केले. ‘फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण खरा अष्टपैलु विराट कोहली’
Batting, Fielding, Keeping & Bowling
Allrounder @imVkohli ? ????❤️ pic.twitter.com/mbtoZucesr
— Virat Kohli Trends™ (@TrendVirat) October 20, 2021
दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले,
‘दुसऱ्या फलंदाजांसाठी आपली जागा करून दिल्यानंतर तो सहावा गोलंदाज म्हणून गोलंदाजीला आला. टीम मॅन’
1. Sitting out himself so that an extra batsman could get a chance to play.
2. Coming in to bowl as the 6th bowling option, just what the team needed.
Virat Kohli – The perfect team man. ???? pic.twitter.com/NLvZ7NPNuX
— Harsh (@100off52) October 20, 2021
भारतीय संघाचा मोठा विजय
मुख्य स्पर्धेच्या आधीचा अखेरचा सामना असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली. तरीही भारताच्या इतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला केवळ १५२ धावांवर रोखले. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दोन बळी मिळवले तर ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ याने ५७ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पार करताना सलामीवीर केएल राहुल व रोहित शर्मा यांनी जोरदार फटकेबाजी केली. राहुलने ३९ तर, रोहितने ६० धावांची खेळी केली. अखेरीस सूर्यकुमार यादव याने ३८ धावांवर नाबाद राहत भारताला ९ गड्यांनी विजय मिळवून दिला. विश्वचषकातील भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.






