आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील २१ वा सामना बुधवारी (२७ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात स्कॉटलॅंड आणि नामबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात नामबिया संघाने विजय मिळवत गुणतालिकेत टॉप-३ मध्ये प्रवेश केला आहे.
नामबिया संघ सध्या २ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत त्यांनी न्यूझीलंड आणि भारतीय संघाला देखील मागे टाकले आहे. या दोन्ही संघांना अजुनपर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाहीये. न्यूझीलंड संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. भारत आणि न्यूझीलंड संघाला पाकिस्तान संघाने पराभूत केले आहे. पाकिस्तान संघ उपांत्यफेरीत प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार दिसतो आहे.
सुपर-१२ च्या ग्रुप बीबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये भारत, न्यूझीलंड, अफगानिस्तान, पाकिस्तान, नामबिया आणि स्कॉटलॅंड या संघांचा समावेश आहे. यामध्ये पाकिस्तान संघाने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात जोरदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तर अफगानिस्तान आणि नामबिया संघाला प्रत्येकी १-१ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर स्कॉटलॅंड संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे त्यांचे उपांत्य फेरीत पोहचणे कठीण झाले आहे. ते गुणतालिकेत तळाशी आहेत.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नामबिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर स्कॉटलॅंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, मायकल लिस्कने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तर ख्रिस ग्रिव्सने २५ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर स्कॉटलॅंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १०९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना नामबिया संघाकडून जेजे स्मितने नाबाद ३२ धावांची खेळी केली. तर क्रेग विलियम्सने २३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर नामबिया संघाने ५ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
जावयाच्या कामगिरीवर सासरे खूश; खास आकडेवारीसह केली धोनीची तुलना
विंडीजचा संघ करणार जरबदस्त पुनरागमन! आयपीएलमध्ये चमकलेल्या ‘या’ धाकड अष्टपैलूला दिलीय संधी