‘ब’ गटातील पाचव्या दिवशी दोन लढती एकतर्फी झाल्या तर दोन लढती चुरशीच्या झाल्या. नाशिक द्वारका डिफेंडर्स व नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने आपल्या प्रतिस्पर्धी एकतर्फी पराभूत केले. तर परभणी पांचाला प्राईड व ठाणे हम्पी हिरोज संघांनी अटीतटीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले. नांदेड व ठाणे संघांनी 4 सामने जिंकले असून अनुक्रमे ते पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
आज झालेल्या पहिल्या लढतीत नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाने रत्नागिरी अरावली ॲरोज संघाला 74-43 असे पराभूत केले. नाशिक कडून आकाश शिंदेच्या 35 गुणांच्या वादळी खेळीने रत्नागिरी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. रत्नागिरीच्या साईराज कुंभार व वेद पाटील ने सुपर टेन करत चांगला प्रतिकार केला. तर आजच्या दुसरा सामना परभणी पांचाला प्राईड विरुद्ध मुंबई शहर मौर्य मेवरीक्स यांच्यात झाला. मध्यंतराला मुंबई शहर कडे 23-19 अशी आघाडी होती. मात्र मुन्ना शेख च्या अष्टपैलू खेळीने व वैभव कांबळेच्या जबरदस्त पकडीनी परभणी संघाने सामना फिरवत 37-35 असा विजय मिळवला.
आजची तिसऱ्या लढतीत ठाणे हम्पी हिरोज संघाने अटीतटीच्या लढतीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाला अवघ्या 1 गुणाने नमवले. ठाणे कडून मंगेश सोनवणे ने 7 गुणांची महत्वपुर्ण खेळी केली तर पकडीत अहमद इनामदार ने 4 गुण मिळवले. परभणीच्या श्रेयस उमरदंडची अष्टपैलू खेळी मात्र व्यर्थ ठरली. आजच्या शेवटच्या लढतीत नांदेड चांबल चॅलेंजर्स ने 67-18 असा धुळे चोला वीरांस संघाचा पराभव केला. नांदेड कडून अजित चव्हाण ने चढाईत 33 गुण मिळवत स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला. (Nanded Chambal Challengers, Thane Hampi Heroes 4th in a row)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पियुष चावला ईज बॅक! ललित यादवचा त्रिफळा उडवत नावावर केला आयपीएलमधील मोठा विक्रम
VIDEO । रिव्हर्स स्वीप वगैरे काही नाही! मोठा शॉट खेळण्यासाठी वॉर्नरने थेट उजव्या हाताने केली फलंदाजी