पुणे (23 मार्च 2024) – आज तिसरा सामना नंदुरबार विरुद्ध पालघर यांच्यात झाला. पालघर संघ 3 विजयासह प्रमोशन फेरीत तिसऱ्या स्थानावर होता. नंदुरबार संघ 1 विजयासह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर होता. दोन्ही संघानी सावध सुरुवात केली होती. 9 मिनिटांच्या खेळानंतर पालघर संघाने 10-06 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर नंदुरबारच्या ओमकार गाडे ने सुपर रेड करत सामना 10-10 असा बरोबरीत आणला.
नंदुरबार संघाने पालघर संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. सुरुवातिला प्रतिक जाधव ने चढाईत गुण मिळवत पालघर संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र त्यानंतर नंदुरबारच्या जयेश महाजन व ओमकार गाडे यांनी आक्रमक चढाया करत गुण मिळविले. मध्यंतराला नंदुरबार संघाकडे 21-18 अशी आघाडी होती. मध्यंतरा नंतर पालघरच्या प्रतिक जाधव ने चपळाई चढाया करत गुण मिळवले. पालघर ने नंदुरबार संघाला ऑल आऊट करत सामना 23-23 असा बरोबरीत आणला होता.
नंदुरबारच्या वरून खंडले ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. जयेश महाजन व तेजस राऊत यांनी चपळाई ने चढाईत गुण मिळवत पालघर संघाला मध्यंतरा नंतर 2 वेळा ऑल आऊट करत निर्यायक आघाडी मिळवली. नंदुरबार संघाने सामना 44-30 असा जिंकला. नंदुरबार कडून वरून खंडले ने चढाईत 7 तर पकडी एकूण 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. जयेश महाजन, तेजस राऊत ओमकार गाडे यांनी चढाईत निर्यायक गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. पालघर कडून प्रतिक जाधव ने 12 गुणांची खेळी केली. (Nandurbar team defeated Palghar team in the promotion round)
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- वरून खंडले, नंदुरबार
कबड्डी का कमाल – ओमकार गाडे, नंदुरबार
महत्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ, इशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर
शरद पवारांकडून मिळाली होती सचिनला फॉफर, मास्टर ब्लास्टरनं सुचवलं ‘या’ दिग्गजाचं नाव