पुणे (17 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजचा चौथा सामना नंदुरबार विरुद्ध लातूर या संघात झाला. नंदुरबार संघांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण सामना होता. नंदुरबार संघाने जोरदार सुरुवात करत सामन्यात आघाडी मिळवली. नंदुरबार कडून वरून खडले व जयेश महाजन यांनी चतुरस्त्र चढाया करत आपली आघाडी वाढवली.
मध्यांतरा पूर्वी नंदुरबार संघाने लातूर संघाला दोन वेळा ऑल आऊट करत 23-09 अशी आघाडी मिळवली होती. नंदुरबार कडून श्रेयस उमरदंड व ओमकार गाडे यांनी बचावत उत्कृष्ट खेळ केला. लातूर कडुन अजिंक्य कटले ने चांगली लढत दिली. वरून खडले ने सुपर टेन पूर्ण करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला.
नंदुरबार संघाने संपूर्ण सामन्यात 3 वेळा लातूर संघाला ऑल आऊट केले. नंदुरबार संघाने 52-23 असा सामना जिंकला. नंदुरबारच्या वरून खडले ने चढाईत 15 गुण मिळवले तर जयेश महाजन व ओमकार गाडे यांनी अष्टपैलू खेळी केली. श्रेयस उमरदंड ने 5 पकडी केल्या तसेच संचित शिंदे ने चढाईत 6 गुण मिळवले. लातूर संघाकडून अजिंक्य कटले ने सर्वाधिक 15 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- वरून खडले, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- श्रेयस उमरदंड, नंदुरबार
कबड्डी का कमाल – वरून खडले, नंदुरबार
महत्वाच्या बातम्या –
‘मी यासाठी आयुष्यभर धोनीचा आभारी राहीन…’, वाचा अश्विन नक्की कशाविषयी बोलतोय
असं केलं तर सॅमसन टी-20 विश्वचषक खेळणार! माजी क्रिकेटपटूकडून मिळाला सल्ला