---Advertisement---

युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास

---Advertisement---

न्युयॉर्क।  युएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असणाऱ्या नाओमी ओसाकाने सेरेना विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. यामुळे एकेरीत ग्रॅंड स्लॅम जिंकणारी ओसाका जपानची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली आहे.

तसेच विल्यम्सला हे ग्रॅंड स्लॅम जिंकून ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या महिलांच्या सार्वकालिन २५ ग्रॅंड स्लॅमची बरोबरी करण्याची संधी होती. मात्र तिची ही संधी थोडक्यात चुकली.

या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ओसाकाने २-१ अशी आघाडी घेतली होती. यावेळी विल्यम्सने १३ अनफोर्स्ड एरर केल्याने ओसाका ४-१ अशी पुढे गेली.

पहिला सेटमध्ये पराभूत झाल्याने आर्थर अशे स्टेडियमवरील विल्यम्सचे चाहते चांगलेच चिडले होते ते वारंवार ओसाकाला बु असा आवाज काढत होते.

दुसऱ्या सेटमध्ये विल्यम्सने चांगली सुरूवात केली होती पण पंच कार्लोस रॅमोसने तिला नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला.

“मी जिंकण्यासाठी कधीच दुसरा अयोग्य मार्ग वापरत नाही, त्यापेक्षा मी त्या सामन्यात पराभूत होणे मला आवडेल”, असे ३६ वर्षीय विल्यम्सने रॅमोस यांना म्हटले.

विल्यम्स ३-१ अशी आघाडीवर असताना तिच्याकडून दोन चुका झाल्याने तिने रागाने रॅकेट मैदानावर आपटली यामुळे तिला पेनाल्टी मिळाली.

यावेळी मात्र विल्यम्सला राग अनावर न झाल्याने तिने परत एकदा रॅमोसला खडे बोल सुनावले. “मी जिंवत असेपर्यंत तू माझ्या पुढील कोणत्याच सामन्यात असणार नाही. तुला माझी माफी मागायला हवी”, असे बोलल्याने तिला आणखी एक पेनाल्टी मिळाली.

दुसरा सेट आणि सामना जिकंल्यावर ओसाकाला रडू कोसळले कारण विल्यम्सचे चाहते ओसाकावर खुप नाराज झाले. ट्रॉफी वितरणावेळी त्या दोघीही खुप निराश दिसत होत्या.

२० वर्षीय ओकासाने विल्यम्सला दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. याआधी तिने मायामी ओपनमध्ये विल्यम्सला पराभूत केले असल्याने त्याच्यात आता २-२ अशी बरोबरी आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेम्स अँडरसन ठरला टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी सर्वात धोकादायक गोलंदाज

युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment