---Advertisement---

कॉमनवेल्थआधीच भारतीय क्रीडाक्षेत्रात खळबळ! वाचा सविस्तर वृत्त

On: सोमवार, जुलै 18, 2022 8:48 PM
---Advertisement---

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी सोमवारी (१८ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. आयओए सचिवांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. बत्रा यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्यत्वही सोडले. बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी बत्रा यांचा निर्णय आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बत्रा यांना आयओए अध्यक्ष म्हणून काम करणे थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर बत्रा यांनीही या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केलेली. परंतु न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावले. यानंतर बत्रा यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

बत्रा यांनी अधिकृतपणे त्यांच्या पदांचा तीन स्वतंत्र पत्रांद्वारे लेखी राजीनामा दिला. यामध्ये मात्र त्यांनी हे पद सोडण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले. बत्रा यांनी एआयएच कार्यकारी मंडळाला लिहिले की, “वैयक्तिक कारणांमुळे मी एफआयएचच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”

२५ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने बत्रा यांना आयओए अध्यक्षपदावरून हटवले होते. न्यायालयाने त्यांचे हॉकी इंडियाचे आजीवन सदस्यपद रद्द केलेले. तसेच बत्रा यांना आयओए अध्यक्षपदावरून हटवले. याच पदामुळे बत्रा २०१७ मध्ये आयओए अध्यक्ष म्हणून नामांकन दाखल करण्यात यशस्वी ठरले आणि जिंकले.

न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरू होते काम

पद सोडण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही बत्रा काम करत राहिलेले. माजी ऑलिम्पियन आणि हॉकी विश्वचषक विजेते अस्लम शेर खान यांनी या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. खान यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती दिनेश शर्मा यांनी बत्रा यांच्या विरोधात हा निकाल दिला. खान यांच्या वकिलाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, “न्यायालयाने नरिंदर बत्रा यांना आयओएचे अध्यक्ष म्हणून तत्काळ प्रभावाने काम करण्यापासून रोखले आहे. त्यांनी सलगपणे काम करत न्यायालयाचा अवमान केला होता.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

हरभजनची ‘सेकंड इनिंग’ सुरू! घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

दिल्लीच्या पठ्ठ्यांनी महाराष्ट्राच्या गड्यावर केला शॅम्पेनचा वर्षांव, भारताचा विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल 

मावळकन्या हर्षदाचे जागतिक स्पर्धेत ‘सुवर्णयश’ 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---