भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कौतुकास्पद प्रदर्शन केले आहे. पुरुषांच्या संघाने ४१ वर्षांची प्रतिक्षा संपवत ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. तर भारतीय महिला हॉकीपटूंना कांस्य पदक जिंकण्यात अपयश आले आहे. परंतु त्यांनी जबरदस्त प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकली आहेत. असे असताना शुक्रवार रोजी (०६ ऑगस्ट) भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्काराला दिले आहे. मात्र यानंतर भारतवासींनी मोदींकडे मोठी मागणी करण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी (०६ ऑगस्ट) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले गेले असल्याची घोषणा केली आहे.
‘भारतभरातील नागरिकांकडून मला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या भावनांचा आदर करून मी अशी घोषणा करतो की, इथून पुढे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल!,’ असे पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे.
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views.
Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award!
Jai Hind! pic.twitter.com/zbStlMNHdq
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
यानंतर अनेकांनी मोदींवर निशाणा साधत जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, ‘नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम’चे नाव बदलण्याची मागणी केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अहमदाबादच्या पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामना झाला होता. पुर्नबांधणीनंतर मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्यावहिल्या सामन्यापूर्वी मोदींनी स्टेडियमचे नाव बदलून आपल्या नावावर नवे नाव ठेवले होते.
मात्र आता भारतातील सर्वात मोठ्या क्रिडा पुरस्कारावरुन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटवून त्याला दिग्गज हॉकीपटूचे नाव देण्याचे पाऊल मोदींनी उचलले आहे. मग स्वत:च्या नावावर असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमलाही एका दिग्गज क्रिकेटपटूचे नाव देण्याच्या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.
Good move
It’s time we remove all politicians’ names from sports stadiums, awards etcJust like Major Dhyan Chand Khel Ratna would motivate a player more than Rajiv Gandhi Khel Ratna
Players wud be motivated to be playing in a player named and not Narendra Modi stadium
— Sakshi Joshi (@sakshijoshii) August 6, 2021
Not sure if it's appropriate that the country's largest stadium is named after Narendra Modi himself. https://t.co/YwfyXdnrDB
— Saket Gokhale (@SaketGokhale) August 6, 2021
Great decision by Modi Govt to rename Rajiv Gandhi Khel Ratna Award to Major Dhyan Chand Khel Ratna Award.
Now I hope they can rename Narendra Modi Stadium and Jaitley Stadium also. Remove all politician names.
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) August 6, 2021
Good. No sporting award or stadium should be named after politicians.
Now change Narendra Modi stadium’s name too. https://t.co/WIju0N4l5o— Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) August 6, 2021
Here is another request. Hope you will respect the sentiments associated with cricket and its fans.
Change the name of "Narendra Modi stadium" to "Vinoo Mankad Stadium" pic.twitter.com/r1GN6qfpcP— Aneesh ???????? (@Xperian_) August 6, 2021
Retweet if you want to rename Narendra Modi stadium to the Sachin Tendulkar stadium.
— Vinayak ???? (@NextBiIIionairs) August 6, 2021
https://twitter.com/ItsRoshanRai/status/1423539879896522755?s=20
काहींनी ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’चे नाव बदलून ‘विनू मंकड स्टेडियम’, असे ठेवण्याची मागणी केली आहे. तर काहींनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे नाव या स्टेडियमला देण्याचे सुचवले आहे. काहींनी तर नरेंद्र मोदी स्टेडियमसह अरुण जेटली स्टेडियमचेही नाव बदलण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘चेंडू माझ्या पट्ट्यात आला तर मी चौकार किंवा षटकार ठोकणारच,’ रोहितचे टीकाकारांना सणसणीत उत्तर
अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे
वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त ‘जेसी रायडर’