---Advertisement---

अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 11:35 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दोन दिवसात भारतीय संघाने चांगलीच पकड बनवून ठेवली आहे. परंतु या सामन्यात अनुभवी ईशांत शर्मा याला का संधी दिली गेली नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामागील खरे कारण आता समोर आले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळाले आहेत, ज्यामुळे चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. नाणेफेकीनंतर विराट कोहलीने सांगितले होते की, “भारतीय संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांसह आणि रवींद्र जडेजा या एकमात्र फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे.”(Why Ishant Sharma not picked for first test against England,click here to know the reason)

भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये ईशांत शर्मा आणि आर अश्विन या अनुभवी खेळाडूंचे नाव नव्हते. त्यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आले आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान ईशांत शर्माच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तो या दुखापतीतून अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. याच कारणास्तव त्याला पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप यासंदर्भात कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ईशांत शर्मा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा सहावा गोलंदाज आहे. ईशांतने आतापर्यंत कसोटी स्वरुपात ३२.१८ च्या सरासरीने ३०६ गडी बाद केले आहेत. या दरम्यान त्याने ११ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित अवघ्या ३६ धावांवर झेलबाद, मैदान सोडताना स्वत:वरच काढला राग

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

किती उत्साह म्हणायचा! पंत मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर जोमात; म्हणाले, ‘आता फक्त हल्लाबोल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---