भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने क्रिकेट जगतात आपली क्षमता सिद्ध केली आहे. खेळाचे स्वरूप कोणतेही असो, बुमराहसमोर जगभरातील फलंदाज अनेकदा अडचणीत येतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेट दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी देखील बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज इहसानुल्लाहने मोठा दावा करत, नसीम शाह जसप्रीत बुमराहपेक्षा चांगला गोलंदाज असल्याचे म्हटले.
एका पॉडकास्टवर बोलत असताना इहसानुल्लाह बुमराह आणि नसीम शाह यांच्याबद्दल बोलला. इहसानुल्लाह म्हणाला, “पहिले तर जसप्रीत बुमराहपेक्षा नसीम शाह चांगला गोलंदाज आहे.”
त्यानंतर पॉडकास्टच्या होस्टने इहसानुल्लाला विचारले की बुमराहची कामगिरी नसीम शाहपेक्षा चांगली आहे का? याला उत्तर देताना इहसानुल्लाह म्हणाला, “नसीम शाहने 2022 च्या टी20 विश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती. काहीवेळा खेळाडू वर्षभर खराब टप्प्यातून जातात, पण नसीम अजूनही चांगला आहे.”
2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब पटकावला होता. या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानी होता. बुमराहने 8.27 च्या उत्कृष्ट सरासरीने 15 विकेट घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात त्याने निर्णायक क्षणी जबरदस्त गोलंदाजी करत भारताच्या विजयात हातभार लावला होता.
बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे जो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत 39 कसोटी, 89 वनडे आणि 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 173 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात 149 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 89 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असून, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला काही सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्या दोघांना माझा तिरस्कार वाटायचा, कारण…”, स्टिव्ह स्मिथचे सहकारी खेळाडूंवर आरोप
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?
“बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळणार पण…” पुनरागमनाबद्दल मोहम्मद शमी काय म्हणाला?