‘ब’ गटातील आज शेवटच्या लढती होत्या. नंदुरबार हिमालयन ताहर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झाली. प्रमोशन व प्ले-ऑफ साठी स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. विजया नंतरही इतर निकालावर अवलंबून राहावे लागणार होते. नाशिक कडून आकाश शिंदे ने आक्रमक सुरुवात केली.
मध्यांतराला नाशिक कडे 22-15 अशी आघाडी होती. आकाश शिंदे ने पहिल्या हाफ मध्ये 10 गुण जरी मिळवले असले तर खूप वेळ आकाश ला बाहेर बसावं लागला होता. त्यामुळे नाशिक संघाला आघाडी वाढवता आली नाही. नंदुरबारचा तेजस काळभोर चांगला खेळ करत होता. मध्यंतरानंतर तेजस काळभोर ने चतुरस्त्र चढाया करत तर श्रेयस उमरदंड ने जबरदस्त पकडी करत नाशिक संघावर लोन पाडला. शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 27-27 असा सामना सुरू होता.
शेवटच्या दहा मिनिटात नाशिक संघाने नंदुरबार वर लोन पाडत सामन्यात पकड मजबूत केली. नाशिक संघाने 45-33 असा विजय मिळवत प्ले-ऑफसच्या आशा कायम ठेवल्या. परभणी व रत्नागिरी संघांनी आपला शेवटचा सामना गमावल्यास नाशिक संघ प्ले-ऑफस मध्ये दाखल होऊ शकतो. नाशिक कडून आकाश शिंदे ने 18 गुण मिळवले. तर पकडीत जयेश पाटील ने 5 व ओंकार पोकळे यांनी 4 पकडी केल्या. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने 13 गुण मिळवले तर श्रेयस उमरदंड ने हाय फाय पूर्ण केला. (Nashik Dwarka Defenders third win in a row)
बेस्ट रेडर- आकाश शिंदे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
बेस्ट डिफेंडर्स- जयेश पाटील, नाशिक द्वारका डिफेंडर्स
कबड्डी का कमाल- आकाश शिंदे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘वॉर्नर खरोखर चांगला खेळतोय?’, माजी दिग्गजाच्या मते प्लेऑफ्समधून दिल्लीचा बाहेर…
ठाणे हम्पी हिरोज आणि नांदेड चांबल चॅलेंजर्स प्रमोशन आणि प्ले-ऑफससाठी पात्र