पुणे (2 एप्रिल 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज रेलीगेशन फेरीचे सामने पूर्ण झाले. उद्यापासून प्ले-ऑफसच्या सामान्यांना सुरुवात होणार आहे. रेलीगेशन फेरीतून रायगड व नाशिक हे संघ प्ले-ऑफस साठी पात्र ठरले. उर्वरित सहा संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रेलीगेशन फेरीत नाशिक संघ पहिल्या क्रमांकावर तर रायगड संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
आज झालेल्या पहिल्या लढतीत धुळे संघाने 52-31 असा जालना संघावर विजय मिळवला. धुळे संघाकडून जैवर्धन गिरासे व अक्षय पाटील यांनी प्रत्येकी 12 गुण मिळवले. तर राकेश पाटील ने 8 पकडी केल्या. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात रायगड संघाने 56-21 असा लातुर संघाचा पराभव करत रेलीगेशन फेरीत सहावा विजय मिळवला. अनुराग सिंग ने चढाईत 19 तर विराज पाटील ने पकडीत 6 गुण मिळवले.
सातारा संघाने धाराशिव संघावर 30-17 असा विजय मिळवला. सातारा कडून यश निकम ने 9 गुण तर अथर्व सावंत ने 6 गुण मिळवले. आजच्या शेवटच्या सामन्यात नाशिक संघाने नांदेड संघावर 56-19 असा विजय मिळवत रेलीगेशन फेरीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. नाशिक कडून पवन भोर ने 17 गुण मिळवले तर ईश्वर पथाडे ने 11 गुण मिळवले. ओंकार पोकळे व गणेश गीते ने उत्कृष्ट पकडी केल्या.
रेलीगेशन फेरी गुणतालिका.
1. नाशिक – 38 गुण (7 सामने)
2. रायगड – 38 गुण (7 सामने)
3. धुळे – 31 गुण (7 सामने)
4. जालना – 19 गुण (7 सामने)
5. सातारा – 15 गुण (7 सामने)
6. नांदेड – 14 गुण (7 सामने)
7. लातूर – 10 गुण (7 सामने)
8. धाराशिव – 3 गुण (7 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
युवा कबड्डी सिरीजमध्ये रेलीगेशन फेरीत नाशिक संघाचा विजयाचा षटकार
रेलीगेशन फेरीत सातारा संघाची धारशिव संघावर मात
रेलीगेशन फेरीत सहावा सामना जिंकत रायगड संघाची गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप