पुणे (2 एप्रिल 2024) – युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीच्या शेवटच्या दिवशी तिसरा सामना धारशिव विरुद्ध सातारा यांच्यात झाला. दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असल्याने सामना फक्त औपचारिकता होता. दोन्ही संघानी शांतपणे खेळायला सुरुवात केली कोणत्याही आक्रमकता दाखवली नाही. 10 व्या मिनिटाला सामना 5-5 असा बरोबरीत होता. सातारा कडून ओमकार पालकर ने तर धाराशिव कडून दिपक राठोड ने चढाईत गुण मिळवले.
धारशिवच्या अनिकेत भारती ने उत्कृष्ट पकडी करत सामन्यात चुरस वाढवली होती. तर सातारा कडून अथर्व सावंत ने चांगल्या पकडी केल्या. मध्यंतराला सातारा संघाकडे 11-10 अशी आघाडी होती. त्यानंतर सातारा संघाकडून यश निकम ने आक्रमकता दाखवत चढाईत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. सातारा संघाने धाराशिव संघाला ऑल आऊट करत पकड मजबूत केली.
सातारा संघाकडून अथर्व सावंत ने बचावफळीत महत्वपूर्ण भूमिका निभावली. सातारा संघाने 30-17 असा विजय मिळवत आपली स्पर्धेतील सांगता केली. सातारा कडून यश निकम ने सर्वाधिक 9 गुण मिळवले. अथर्व सावंत ने पकडीत 6 गुण मिळवले. ओमकार पालकर चढाईत 4 गुण मिळवले. आनंद शिंदे व प्रज्वल झंझाने ने पकडीत प्रत्येकी 2 गुण मिळवले. तर धाराशिव कडून दिपक राठोड ने चढाईत 5 गुण मिळवले. तर अनिकेत भारती व हर्षद बाबर ने पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- यश निकम, सातारा
बेस्ट डिफेंडर- अथर्व सावंत, सातारा
कबड्डी का कमाल – अथर्व सावंत, सातारा
महत्त्वाच्या बातम्या-
रेलीगेशन फेरीत सहावा सामना जिंकत रायगड संघाची गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप