पुणे (2 एप्रिल 2024) – आजच्या दिवसाचा शेवटचा सामना युवा कबड्डी सिरीजच्या दृष्टीने खास होता. सर्व सिजन मिळून युवा कबड्डी सिरीजचा 1000 वा सामना होता. नांदेड विरुद्ध नाशिक यांच्यात हा सामना रेलीगेशन फेरीतील शेवटचा सामना होता. नांदेडच्या मोहसीन पठाण ने पहिल्याच चढाईत गुण मिळवत संघाचा खात उघडला. तर नाशिक कडून पवन भोर ने आपल्या संघाचा खात उघडला. पवन भोर ने आक्रमकता दाखवत चपळाईने गुण मिळवले. नाशिक संघाने 10 व्या मिनिटाला नांदेड संघाला ऑल आऊट करत 13-05 अशी आघाडी मिळवली.
नाशिक कडून पवन भोर व ऋषीकेश गडाख चतुरस्त्र चढाया करत सामन्यावर पकड मजबूत केली. मध्यंतराला 29-07 नाशिक संघाकडे आघाडी होती. नाशिक संघाचे खेळाडू साठी हा सामना प्ले-ऑफसच्या दृष्टीने सरावच होता. पवन भोर, ईश्वर पथाडे व शशिकांत बरकांड यांनी चढाईत गुण मिळवत संघाचा विजय निश्चित केला. तर ओमकार पोकळे व गणेश गीते ने उत्कृष्ट पकडीचा नमुना दाखवला. मध्यंतरा नाशिक संघाने नांदेड संघाला 2 वेळा ऑल आऊट करत सामना जिंकला.
नाशिक संघाने रेलीगेशन फेरीतील शेवटचा सामना 56-19 असा जिंकला. या विजयासह नाशिक संघाने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. नाशिक कडून पवन भोर ने चढाईत सर्वाधिक 17 गुण मिळवले. ईश्वर पथाडे ने अष्टपैलू खेळ करत 11 गुण प्राप्त केले. ओंकार पोकळे ने पकडीत 7 तर गणेश गीते ने पकडीत 6 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नांदेड संघाकडून मोहसीन पठाण ने सर्वाधिक 5 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- पवन भोर, नाशिक
बेस्ट डिफेंडर- ओंकार पोकळे, नाशिक
कबड्डी का कमाल – पवन भोर, नाशिक
महत्त्वाच्या बातम्या-
रेलीगेशन फेरीत सातारा संघाची धारशिव संघावर मात
रेलीगेशन फेरीत सहावा सामना जिंकत रायगड संघाची गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप
युवा कबड्डी सिरीजच्या रेलीगेशन मध्ये धुळे संघाचा पाचवा विजय