---Advertisement---

‘भारत-पाक’ सामनाच्या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित! दिग्गजांनी केली खडसून टीका

On: मंगळवार, जून 4, 2024 12:09 PM
IND-vs-PAK
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मध्ये 9 जून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील हा सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनूसार हा सामना रात्री 8 वाजता सुरुवात होईल. पण यादरम्यान नासाउ काउंटी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या खेळपट्टीवर क्रिकेट दिग्गज सातत्याने आपली मते मांडत आहेत. काल झालेल्या दक्षिण अफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यात खेळपट्टीचा मूड पहायला मिळाला. वास्तविक, सामन्यात श्रीलंकेचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघर्ष करताना दिसले.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजानी 19.1 षटकात केवळ 77 धावांवर सर्वबाद झाले. श्रीलंकेच्या 8 फलंदाजांना दूहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. यासोबत ज्याप्रकारे खेळपट्टीवरुन चेंडू ज्याप्रकारे येत होता त्यामुळे फलंदाजांना सतत त्रास होत होता. खरंतर भारत आणि पाकिस्तान हा सामना देखील याच मैदानावर होणार आहे. 9 जून रोजी होन्ही संघ आमने सामने असणार आहेत.

भारताचा माजी खेळाडू इरभान पठाण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नासाउच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे.

परंतू काल ज्याप्रमाणे खेळपट्टीचा अंदाज पहायला मिळाला. त्यामुळे दोन्ही संघाच्या फलंदाजाना शुभ संकेत नाही. खेळपट्टीवर फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, तर मात्र गोलंदाज सामना बदलू शकतात, असे मानले जात आहे. मात्र, न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर फलंदाजांची गोची होणार की गोलंदाजांचा कहर? हे पाहावं लागेल.

टी20 विश्वचषकस्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आणि आयर्लंड 5 जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तान आणि आयर्लंडशिवाय भारतीय संघ अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ आपले सुरुवातीचे तीन सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी20 विश्वचषकाचे सामने घरबसल्या मोफत पाहता येणार
न्यूयॉर्कमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसला ‘हिटमॅन’! इंस्टाग्रामवर शेअर केले मजेशीर फोटो
अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---