इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहलीसाठी 2024 हे वर्ष खूप यशस्वी ठरणार असल्याचं त्यानी म्हटलं आहे. नासिर हुसैन याच्या मते विराट कोहलीसाठी 2023 खूप यशस्वी ठरले आणि 2024 देखील खूप यशस्वी ठरेल.
भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी 2023 हे वर्ष खूप खास होते. त्याची बॅट चांगली चालली आणि तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याने यावर्षी 27 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 6 शतके आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 1377 धावा केल्या. तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. सर्व फॉरमॅट्ससह त्याने या कालावधीत एकूण 2048 धावा केल्या आणि आठ शतके झळकावली.
नासिर हुसैन (Nasir Hussain) यानी 2023 च्या विश्वचषकातील विराट कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले असून 2024 हे वर्ष विराट कोहलीसाठीही चांगले असेल असे म्हटले आहे. नासिर हुसैन म्हणाले, “माझी पहिली पसंती मेगास्टार विराट कोहली आहे आणि यात शंका नाही. 2023 चा विश्वचषक त्याच्यासाठी खूप चांगला होता. त्याने तोडलेल्या सर्व विक्रमांमध्ये त्याची फलंदाजी किती जबरदस्त होती हे आपल्या लक्षातही आले नाही. तांत्रिकदृष्ट्या मी विराट कोहलीची इतकी चांगली फलंदाजी कधीच पाहिली नाही. मुंबईत श्रीलंकेविरुद्धची त्याची खेळी जबरदस्त होती. त्याच्या बॅटमधून उत्कृष्ट आवाज येत होता. विराट कोहली, भारत आणि विराटच्या चाहत्यांसाठी हे खूप चांगले लक्षण आहे. यावरून विराट कोहलीची मानसिक स्थिती खूपच चांगली असल्याचे दिसून येते.”
विराट कोहलीसाठी नवीन वर्षातील सर्वात मोठे आव्हान दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना असेल, ज्यामध्ये तो आणखी चांगली कामगिरी करू शकेल. (Former England captain’s big prediction about Virat says He will be the most in 2024)
हेही वाचा
‘IPL ही ऑलिम्पिकसारखी’, लखनऊ संघाच्या नवीन प्रशिक्षकाचं जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगबाबत विधान
‘डेव्हिड वॉर्नर फक्त वीरेंद्र सेहवागच्या मागे’, भारताच्या माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान