---Advertisement---

नॅट सिव्हरची पैसा वसूल कामगिरी! 3.20 कोटींच्याच दर्जाचा खेळ दाखवत बनवले मुंबईला चॅम्पियन

On: सोमवार, मार्च 27, 2023 10:49 AM
---Advertisement---

डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच हंगामात मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. रविवारी (26 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा अंतिम सामना पार पडला. मुंबईने या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात मुंबईची आघाडीची अष्टपैलू नॅट सिव्हर-ब्रंट हिची निर्णायक कामगिरी ठरली. स्पर्धेतील सर्वात महागडी विदेशी खेळाडू असलेल्या सिव्हर-ब्रंटने आपल्यावर लावलेली किंमत योग्य ठरवत मुंबईच्या यशात सिंहाचा वाटा उचलला.

इंग्लंडची सर्वकालीन महान अष्टपैलू असलेल्या सिव्हर-ब्रंटला डब्ल्यूपीएल लिलावात मोठी मागणी होती. युपी वॉरियर्झ व दिल्ली कॅपिटल्स यांनाच पछाडत मुंबईने तिला तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. ऍश्ले गार्डनरसह ती स्पर्धेतील सर्वात महागडी विदेशी खेळाडू ठरलेली.

आपल्यावर लावलेली बोली व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमावलेले नाव या दोन्ही गोष्टींचा दबाव तिच्यावर होता. मात्र, तिने हा कोणताच दबाव न घेता मुंबईच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये तिची बॅट चांगलीच बोलली. तिने संपूर्ण स्पर्धेत 10 सामने खेळताना 64.40 च्या शानदार सरासरीने 332 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिने एलिमिनेटर व अंतिम सामन्यात अर्धशतके झळकावत तसेच सामनावीर पुरस्कार मिळवत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही ती 10 बळी मिळवण्यात यशस्वी ठरली.‌ अंतिम सामन्यात तीने अखेरपर्यंत विजयी चौकार देखील मारला. मुंबई इंडियन्स संघ अंतिम सामन्यात काहीसा अडचणीत होता. त्यावेळी तिने अखेरपर्यंत मैदानावर नाबाद राहत 55 चेंडूवर 60 धावांची संयमी खेळी केली. यासाठीच तिला अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून देखील घोषित केले गेले.

(Nat Sciver-Brunt All Rounder Heroics In Mumbai Indians WPL Triumph)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 44 चेंडूत टी20 क्रिकेटमध्ये शतक! क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकी संघ फायद्यात
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---