---Advertisement---

सामना गमावला, पण पंड्याने मन जिंकलं; पतीची विस्फोटक फलंदाजी पाहून नताशानेही मारलेल्या उड्या

On: गुरूवार, नोव्हेंबर 10, 2022 7:06 PM
Cricketer-Hardik-Pandya-And-Natasa-Stankovic
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघ तुफान फॉर्मात होता. भारताने उपांत्य सामन्यापूर्वी फक्त एक सामना गमावत बाद फेरीत प्रवेश केला होता. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांची चांगलीच निराशा झाली. आयर्लंडकडून पराभूत होणाऱ्या बलाढ्य इंग्लंड संघाने भारताची दाणादाण उडवली. इंग्लंडने दहाच्या दहा विकेट्सने हा सामना आपल्या खिशात घातला आणि अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी शानदार फटकेबाजी केली. त्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. यावेळी पंड्याची फलंदाजी पाहून त्याची पत्नीही जल्लोष करताना दिसली.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, त्यांना वेगवान धावा करता आल्या नाहीत. भारताची पहिली विकेट 9 धावा असताना दुसऱ्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलच्या रूपात पडली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने 40 चेंडूत 50 धावांचे मोलाचे योगदान दिले. पुढे चौथ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादव या सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. त्याला 14 धावांवर समाधान मानावे लागले.

यानंतर पाचव्या क्रमांकावर भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) फलंदाजीला आला. त्याने यावेळी दमदार खेळी साकारली. त्याने भारतीय संघाला 168 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने फक्त 33 चेंडूत 63 धावांची खेळी साकारली. हार्दिक पंड्याने आपल्या खेळीदरम्यान 4 चौकार आणि 5 षटकारांची बरसात केली. तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. पंड्या क्रीझवर फलंदाजी करत होता. तो वाट पाहत होता आणि अपेक्षा करत होता की, चेंडू फुल लेंथने येईल. यावेळी त्याने मागे जाऊन चेंडू मारला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला, पण या प्रयत्नात त्याचा पाय यष्टींना धडकला. त्यामुळे तो हिट विकेट झाला.

यादरम्यान  स्टेडिअमध्ये त्याची खेळी पाहत असणारी त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) त्याच्या फलंदाजीने भलतीच खुश झाली. यावेळी नताशा स्टॅन्कोविक सेलिब्रेशन (Natasa Stankovic Celebration) करत उड्या मारताना दिसली. तसेच, तिने पंड्याचा आत्मविश्वासही वाढवला. यावेळी पंड्या बाद झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर निराशा होती, पण तिने या खेळीचे अभिनंदनही केले. यादरम्यानचे तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/KengareA/status/1590640826115190784?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1590640826115190784%7Ctwgr%5E837284e70c765b32569444087df2bd7cb988d514%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fnatasa-stankovic-epic-reaction-goes-viral-after-hardik-pandya-brilliant-batting-against-england-in-semifinal-1052078

https://twitter.com/sajcasm_/status/1590641234011643905

https://twitter.com/KengareA/status/1590640826115190784

अंतिम सामना
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (England vs Pakistan) संघात मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. (Natasa Stankovic epic reaction goes viral after Hardik Pandya brilliant batting in 2nd semi final t20 world cup 2022)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघ सेमीफायनलच्या बाहेर पडताच ढसाढसा रडला कॅप्टन रोहित, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
टीम इंडियाकडून 130 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा! उपांत्य सामन्यात हेल्स-बटलरने उडवला 10 गड्यांनी धुव्वा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---